आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत भारतीय संघाने ६ सामने खेळले आहेत आणि ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर १ सामना हा पावसामुळे धुतला गेला आहे. सुपर ८ फेरीत भारतीय संघाने अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा धुव्वा उडवला आहे. यासह भारतीय संघाने सेमिफायनलचं तिकीट जवळजवळ निश्चित केलं आहे. मात्र आता अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर समीकरण पूर्ण बदललं आहे. दरम्यान भारतीय संघासाठी सेमिफायनलमध्ये जाण्याचं समीकरण कसं असेल? समजून घ्या.
भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला तरी देखील सेमिफायनलमध्ये जाऊ शकतो. मात्र नेट रनरेट चांगला असणं गरजेचं असणार आहे. जर भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून ४० किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी किंवा ३१ चेंडूंच्या फरकाने पराभव झाला तर भारतीय संघ नेट रनरेटमध्ये मागे पडेल. अशा स्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी ४-४ गुणांसह पहिल्या दुसऱ्या स्थानी असतील.
अफगाणिस्तानचा संघ सध्या तुफान कामगिरी करतोय. त्यामुळे अफगाणिस्तानलाही सेमिफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. जर अफगाणिस्तानने बांगलादेशवर ८० किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी विजय मिळवला. तर अफगाणिस्तानचा नेट रनरेट हा भारतीय संघाच्या पुढे जाईल. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान सेमिफायनलसाठी पात्र ठरतील. तर भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.
यासह बांगलादेश संघाला देखील संधी असणार आहे. यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात ५५ धावांनी किंवा ४१ चेंडू राखून विजय मिळवावा लागेल. त्यानंतर बांगलादेशला अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात ३१ धावांनी किंवा २३ चेंडू राखून विजय मिळवावा लागणार आहे. अशा स्थितीत भारतीय संघ सेमिफायनलसाठी पात्र ठरेल. तर ऑस्ट्रेलिया - अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे प्रत्येकी २-२ गुण असतील. मात्र नेट रनरेटच्या बळावर बांगलादेशचा संघ सेमिफायनलसाठी पात्र ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.