oman vs namibia twitter
Sports

Oman vs Namibia: १२ वर्षांनंतर T-20 WC मध्ये सुपर ओव्हरचा थरार! रोमांचक सामन्यात नामिबियाने मारली बाजी

Oman vs Namibia, Super Over: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत नामिबियाने ओमानवर शानदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेत नवख्या संघांनी आतापर्यंत लक्षवेधी कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. स्पर्धेतील तिसरा सामना ओमान आणि नामिबिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. सुपर ओव्हरने निकाल लागलेल्या या सामन्यात नामिबियाने ओमानवर ११ धावांनी विजय मिळवला आहे.

या सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ओमानकडून खलिद कैलने ३९ चेंडूंचा सामना करत ३४ धावांची खेळी केली. तर जिशन मक्सूदने २० चेंडूंचा सामना करत २२ धावांची खेळी केली. तर आयान खानने १५ धावा केल्या. ओमानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. नामिबियाच्या शानदार गोलंदाजीसमोर ओमानचा डाव १०९ धावांवर आटोपला. (ICC T20 World Cup 2024)

नामिबियाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ११० धावा करायच्या होत्या. हे आव्हान मोठं नव्हतं. मात्र या धावांचा पाठलाग करताना ओमानच्या गोलंदाजांनी नामिबियाच्या फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. नामिबियाकडून फ्रायलिंकने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. निको डेविनने २४ धावा केल्या. मात्र २० षटकअखेर नामिबियाचा संघ देखील १०९ धावांपर्यंत मजल मारु शकला. शेवटी हा सामना बरोबरीत समाप्त झाला. (Oman vs Namibia)

हा सामना बरोबरीत समाप्त झाल्याने सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लावला गेला. तब्बल १२ वर्षांनंतर पहिल्यांदाचाच या स्पर्धेचा निकाल सुपर ओव्हरने लावला गेला. सुपर ओव्हरमध्ये नामिबियाचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. नामिबियाकडून डेव्हिड विसेने ४ चेंडूत नाबाद १३ आणि इरॉसमसने नाबाद ८ धावा करत संघाची धावसंख्या २१ धावांपर्यंत पोहचवली. ओमानला हा सामना जिंकण्यासाठी ६ चेंडूत २२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ओमानला अवघ्या १० धावा करता आल्या. यासह नामिबियाने या सामन्यात ११ धावांनी बाजी मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: 'प्रिय अजित दादा, अजूनही महाराष्ट्र...'; बिग बॉस मराठीच्या मंचावर रितेश देशमुख झाला भावुक, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

SCROLL FOR NEXT