icc t20 world cup 2024 schedule india vs pakistan latest Sports Updates  Saam TV
Sports

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपची तारीख ठरली, भारत-पाकिस्तान 'या' दिवशी भिडणार; पाहा संभाव्य वेळापत्रक

IND vs Pak T20 World Cup 2024: टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक समोर आलं असून भारत पाकिस्तान सामन्याची वेळ देखील ठरली आहे.

Satish Daud

T20 World Cup 2024 Schedule

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरलेल्या टीम इंडियापुढे आता नवी संधी चालून आली आहे. कारण, आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेची तारीख जवळपास निश्चित झाली आहे. सूत्रांच्या हवाल्याने टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक समोर आलं असून भारत पाकिस्तान सामन्याची वेळ देखील ठरली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांच्या माहितीनुसार, यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा जूनमध्ये होईल. ४ जून ते ३० जून या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येईल. या स्पर्धेचं यजमानपद वेस्ट इंडिज आणि अमेरिकेकडे देण्यात आल्याची माहिती आहे. स्पर्धेमध्ये एकून २० संघांचा समावेश असलेली करण्यात आला आहे. (Latest sports updates)

आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा तीन स्टेजमध्ये खेळवण्यात येईल. स्पर्धेतील सहभागी संघांची ४ गटांमध्ये विभागणी करण्यात येईल. त्यानुसार प्रत्येक गटात ५ संघ असतील. ग्रुप स्टेजमध्ये सामने खेळल्यानंतर प्रत्येक गटातून टॉपचे २ संघ पुढच्या फेरीत म्हणजेच सुपर ८ मध्ये प्रवेश करतील. त्यानंतर पुढे सुपर ८ संघांची २ गटात विभागणी केली जाईल.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार

विश्वचषक स्पर्धा म्हटलं, की क्रीडाप्रेमींना भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यांची उत्सुकता असते. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला आयर्लडविरुद्ध होईल. तर दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध ९ जूनला खेळवला जाईल. तर तिसरा सामना १२ जूनला अमेरिकेविरुद्ध होईल. सध्या फक्त टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक समोर आलं आहे.

टी-२० विश्वचषक भारतीय संघाचं संभाव्य वेळापत्रक

  • ५ जून भारत विरुद्ध आयर्लंड, ठिकाण न्यूयॉर्क

  • ९ जून भारत विरुद्ध पाकिस्तान, ठिकाण न्यूयॉर्क

  • १२ जून भारत विरुद्ध अमेरिका, ठिकाण न्यूयॉर्क

  • १५ जून भारत विरुद्ध कॅनाडा, ठिकाण फ्लोरिडा

  • २२ जून भारत विरुद्ध श्रीलंका, ठिकाण अँटिंग्वा

  • २४ जून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ठिकाण सेंट ल्युसिया

  • २६ जून उपांत्य फेरीचा पहिला सामना, ठिकाण गयाना

  • २८ जून उपांत्य फेरीचा दुसरा सामना, ठिकाण त्रिनिदाद

  • २९ जून अंतिम सामना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT