ICC Cricket Rules: ICC च्या नियमांमध्ये मोठे बदल! फिल्डिंग टीमचं टेन्शन वाढलं तर फलंदाजांची चांदीच चांदी

New Cricket Rules: आयसीसीने गेल्या काही दिवसांत क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. काय आहेत ते नियम जाणून घ्या.
icc
iccgoogle
Published On

ICC New Cricket Rules:

आयसीसीने गेल्या काही दिवसांत क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे नियम भारत- दक्षिण आफ्रिका केपटाऊन कसोटी तसेच ऑस्ट्रेलिया- पाकिस्तान कसोटीत लागू करण्यात आले आहेत. मात्र या नियमांबाबत आयसीसीने अधिकृतरीत्या घोषणा केलेली नाही. कुठले आहेत ते नियन जाणुन घ्या. (ICC Rules Changed)

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा संघ जेव्हा भारत दौऱ्यावर आला होता त्यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चांगलीच शक्कल लढवली होती. DRS संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टम्पिंगची अपील करत होते. स्टम्पिंगची अपील केल्यानंतर अंपायर तिसऱ्या अंपायरकडे जातात याच कारणाने रिव्ह्यू नसतानाही ते फलंदाज झेलबाद झाला आहे की नाही हे पाहू शकत होते. या नियमावरुन क्रिकेट एक्सपर्ट नाराजी व्यक्त करताना दिसून आले होते.

icc
IND vs SA 2nd Test: अवघ्या ११ चेंडूत पडल्या टीम इंडियाच्या ६ विकेट्स! केपटाऊन कसोटीत नेमकं काय घडलं?

क्रिकबझच्या वृत्तानुसार या नियमांत बदल करण्यात आला आहे.यापुढे जर यष्टीरक्षकाने स्टम्पिंगची अपील केली. तर लेग अंपायर तिसऱ्या अंपारकडे निर्णय पाठवणार, मात्र तिसरे अंपायर केवळ साईट ऑन रिप्लेवरच लक्ष देणार आणि स्टम्पिंगबाबतच निर्णय देणार. जर खेळाडूंना कॅचबाबत काही शंका असेल तर त्यांना पुन्हा एकदा रिव्ह्यु घ्यावा लागेल. (Latest sports updates)

icc
IND vs SA, Day 1: केपटाऊन कसोटीतील पहिलाच दिवस ठरला रेकॉर्ड ब्रेकिंग! १५० वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच झाला हा रेकॉर्ड

तर दुसरा नियम कन्कशन रिप्लेसमेंटबाबत आहे.जर सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूच्या डोक्याला मार लागून तो दुखापतग्रस्त झाला तर त्याच्या बदली खेळाडूला खेळण्याची परवानगी आहे मात्र तो बदली खेळाडू गोलंदाजी करू शकत नाही.

तसेच तिसरा आणि महत्वाचा नियम म्हणजे नो-बॉलचा नियम.तिसऱ्या अंपायरकडे फ्रंट फुटसह इतर सर्व नो बॉल देण्याचा अधिकार असणार आहे.

ऑन फिल्ड इंजरी ट्रीटमेंटचा नियम- जर एखादा खेळाडू मैदानात खेळत असताना दुखापतग्रस्त झाला तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी ४ मिनिटांचा अवधी दिला जाईल. केवळ ४ मिनिटांसाठी सामना थांबवला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com