T20 World Cup 2022 : टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेला (T20 World Cup) सुरूवात झाली आहे. विश्वचषक आपल्याच देशात यावा, यासाठी जवळपास सर्वच संघ (१६ संघ) प्रयत्नशील आहे. अनेक संघांनी (Cricket) विश्वचषकासाठी युवा खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे. तर काही संघाचे खेळाडू हे जखमी झाल्याने स्पर्धेबाहेर गेले आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धेत नेमका कोणता संघ बाजी मारणार? याकडे क्रिडाप्रेमींच लक्ष लागून आहे. (T20 World Cup Team India)
अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सेमाफायनलमध्ये पोहचणाऱ्या ४ संघाविषयी भविष्यवाणी केली आहे. २३ सप्टेंबरला विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये महामुकाबला होणार आहे. या मॅचआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मोठं भाकीत वर्तवलं आहे. (Maharashtra News)
विश्वचषक स्पर्धेत प्ले-ऑफमध्ये कोण पोहचणार?
यंदाचा टी २० विश्वचष भारतीय संघाने जिंकावा अशी इच्छा मास्टर ब्लास्टरने व्यक्त केली आहे. भारताला चांगली संधी आहे. टीम चांगली संतुलित आहे. भारत वर्ल्ड कपच जेतेपद मिळवेल, अशी अपेक्षा आहे, असं सचिन म्हणाला. विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या चार टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचतील, असं भाकितही सचिनने केलं आहे.
भारत पाकिस्तान सामन्यांत कोण बाजी मारणार?
टी २० विश्वचषक स्पर्धेत येत्या रविवारी (२३ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये महामुकाबला होईल या बहुचर्चित भारत-पाकिस्तान मॅचआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक मोठं भाकीत वर्तवल आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टुर्नामेंटमधील आपल्या सलामीच्या सामन्यात बाबर आझमच्या टीमवर विजय मिळवेल, अशी भविष्यवाणी सचिनने केली.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह
राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.