विराटनं बाऊंड्रीवर एका हातात असला काय झेल घेतला; स्वतःचाच विश्वास बसला नाही, पाहा भन्नाट VIDEO

विराट कोहलीनं टी20 वर्ल्डकपआधी विरोधी संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे.
virat Kohli
virat Kohlisaam tv
Published On

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं टी20 वर्ल्डकपआधी विरोधी संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. कोहलीने (virat Kohli) वॉर्म अप मॅचमध्ये पुन्हा एकदा दाखवून दिलंय की, सामना सुरू असताना तो फिल्डिंगबाबतही किती सतर्क असतो. कोहलीनं आजच्या सामन्यात जबरदस्त फिल्डिंग करत ऑस्ट्रेलियाच्या हातून सामना खेचला. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून कोहलीकडे का बघितलं जातं, हे पुन्हा एकदा त्यानं सिद्ध करून दाखवलं आहे. (Virat kohli takes a brilliant catch on boundary line video viral)

virat Kohli
चमत्कारच! ऑस्ट्रेलियाच्या हातून खेचला सामना, भारताचा विजय या ५ कारणांमुळं झाला, नक्की वाचा!

टी20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) मिशनसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचलेल्या कोहलीनं सुरवातीचे दोन अनऑफिशियल सामने खेळले नाहीत.मात्र, आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वॉर्म अप मॅचमध्ये कोहलीनं अप्रतिम कामगिरी केली. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या वॉर्म अप सामन्यात भारतीय टीमनं ऑस्ट्रेलियाला सहा धावांनी पराभूत केलं. या सामन्यात कोहलीनं उत्कृष्ट फिल्डिंग करत चाहत्यांची मनं जिंकली.

187 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव 180 धावांवर आटोपला. दोन षटकात फक्त 16 धावांची गरज असताना भारतीय गोलंदाजीपुढं ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजांनी नांगी टाकली. एरॉन फिंच 79 आणि टीम डेविड 5 धावांवर बाद झाल्यानं भारताचा विजय निश्चित झाला.याचदरम्यान, 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हर्षल पटेलनं फिंचला बाद केलं. त्यानंतर विराट कोहलीनं चित्त्यासारखी धाव घेतली आणि टीम डेविडला रन आऊट केलं.

यावेळी विराटने एका हाताने स्टप्मवर डायरेक्ट थ्रो केला.डेविडला रन आऊट केल्यानंतर पुन्हा एकदा विराटने विसाव्या षटकात फिल्डिंगमध्ये कमाल दाखवली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 4 चेंडूत 7 धावांची गरज होती. त्याचदरम्यान पॅट कमिन्सनं हवेत मोठा फटका मारला आणि तो बाऊंड्रीच्या दिशेनं गेला, पण विराट कोहलीनं एका हातात झेल घेतल्यानं भारतानं सामना खिशात घातला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com