BCCI चे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा क्रिकेट विश्वातील प्रवास, मुलगा क्रिकेटर तर सून टीव्हीवरील प्रसिद्ध चेहरा

मुंबईतील मुख्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रॉजर बिन्नी यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली.
Roger Binny
Roger Binny SAam TV
Published On

मुंबई : बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इंडियाच्या (BCCI) अध्यक्षपदी माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी यांनी वर्णी लागली आहे. त्यांची 36 वे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. रॉजर बिन्नी यांची 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघातील अष्टपैलू कामगिरी विसरता येणार नाही. आज मुंबईतील मुख्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली.

बीसीसीआयच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये सचिव जय शाह, आशिष शेलार (कोषाध्यक्ष), राजीव शुक्ला (उपाध्यक्ष) आणि देवजित सैकिया (सहसचिव) यांचा समावेश आहे. अरुण धुमाळ आयपीएलचे नवे अध्यक्ष आहेत. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी नामांकनाची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे. या पदासाठी भारताकडून सौरव गांगुली व्यतिरिक्त, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांची नावं चर्चेत आहेत. या पदासाठी मेलबर्नमध्ये 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान आयसीसी बोर्डाची बैठक होणार आहे. (Cricket News)

Roger Binny
विराटनं बाऊंड्रीवर एका हातात असला काय झेल घेतला; स्वतःचाच विश्वास बसला नाही, पाहा भन्नाट VIDEO

कुटूंब स्कॉटलंडमधून येऊन भारतात स्थायिक

रॉजर बिन्नी हे नाव अनेकांना नवीन वाटत असेल. मात्र त्यांचं क्रिकेटमधील योगनदान मोठं आहे. रॉजर हे भारतातील पहिले अँग्लो इंडियन क्रिकेटपटू होते, ज्यांचं कुटूंब स्कॉटलंडहून भारतात आलं होतं. नंतर ते भारतात स्थायिक झाले. रॉजर यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी याने देखील क्रिकेटमध्ये नशीब आजमावण्याच प्रयत्न केला. स्टुअर्ट बिन्नीही भारताकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. मात्र अनेकदा संधी मिळूनही त्याता चमकदार कामगिरी करता आली नाही.

मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोत्तम स्पेल टाकण्याचा विक्रम स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर आहे. स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आणि रॉजर बिन्नी यांची सून मयंती लँगर हा टीव्हीवरील प्रसिद्ध चेहरा आहे. स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये मयंचीचं मोठं नाव आहे.

1983 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स

रॉजर बिन्नी 1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते. या स्पर्धेत त्यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. त्यांनी 8 सामन्यात 18 विकेट्स पटकावल्या होत्या. यादरम्यान त्यांनी 3.81 च्या इकॉनॉमीसह धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यांनी 29 धावांत 4 बळी घेतले होते. त्यांनी स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये विकेट्स मिळवल्या होत्या.

रॉजर बिन्नी यांना भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचाही अनुभवर आहे. सप्टेंबर 2012 मध्ये त्यांना ही भूमिका मिळाली. त्याआधी ते अंडर 19 विश्वचषक 2000 जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकही होते.

Roger Binny
चमत्कारच! ऑस्ट्रेलियाच्या हातून खेचला सामना, भारताचा विजय या ५ कारणांमुळं झाला, नक्की वाचा!

रॉजर बिन्नी यांची कारकिर्द

रॉजर बिन्नी भारताकडून 27 कसोटी आणि 72 एकदिवसीय सामने खेळले. कसोटीत त्यांनी 47 विकेट घेण्यासोबतच 830 धावा केल्या. त्यांनी 1983 मध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद 83 धावा करून भारताला पराभवापासून वाचवले होते. एकदिवसीय सामन्यात त्यांनी 77 विकेट घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com