ICC ODI Batting Rankings : न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा (Team India) युवा सलमीवीर फलंदाज शुभमन गिल चांगलाच चमकला. गिलने तडाखेबाज फलंदाजी करत किवी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत गिलने दोन शतकांसह तब्बल ३६० धावा कुटल्या. या जबरदस्त कामगिरीच्या जोरदावर त्याने आयसीसीच्या वनडे क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. (Latest Marathi News)
श्रीलंकेविरुद्ध (Srilanka) दाखवलेला फॉर्म कायम ठेवत गिलने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धुवून काढलं.पहिल्या सामन्यांत गिलने १४९ चेंडूत २०८ धावा चोपल्या. या खेळीत त्याने १९ चौकार आणि ९ षटकार खेचले. दुसऱ्या सामन्यातही गिल चांगलाच फॉर्ममध्ये दिसला. न्यूझीलंडने दिलेल्या १०८ धावांचा पाठलाग करताना गिलने सावध खेळी (Sport News) करत नाबाद ४० धावांची केली.
दरम्यान, तिसऱ्या सामन्यातही गिलने आपला दमदार फॉर्म कायम ठेवत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. तिसऱ्या सामन्यात गिलने ७८ चेंडतून ११२ धावा फटकावल्या. गिलच्या या दमदार कामगिरीच्या जोरदावर भारताने न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिली. तीन सामन्यांची वनडे सीरिज भारताने ३-० अशी खिशात घातली.
न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये ३६० धावा कुटल्यानंतर शुभमन गिलने आयसीसी वनडे रँकिंगमध्ये तब्बल २० स्थानांनी झेप घेतली.एकदिवसीय क्रमवारीत तो प्रथमच टॉप-10 मध्ये सामील झाला आहे. (India vs New Zealand)
गिलने टीम इंडियाचा विस्फोटक खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना देखील मागे टाकलं. गिल आयसीसी क्रमवारीत ७३४ गुणांसह ६ व्या स्थानावर पोहचला आहे. गिलपाठोपाठ विराट कोहली ७ (७२७ गुण) आणि रोहित शर्मा ८ व्या (७१९ गुण) क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज ८२७ गुणांसह क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
गिल सर्वात वेगवान १ हजार धावा बनवणारा भारतीय
शुभमनने आतापर्यंत फक्त २१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. येथे त्याने ७३.७६ च्या सरासरीने आणि 109.80 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने १ हजार २५४ धावा कुटल्या आहेत. याशिवाय गिल १ हजार धावा पूर्ण करणारा सर्वात जलद भारतीय फलंदाज बनला आहे. आपल्या छोट्या कारकिर्दीत या फलंदाजाने दुहेरी शतकासह ४ शतके झळकावली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.