IND vs NZ 1st T20I: वनडेतून वगळलेला हा आक्रमक गोलंदाज न्यूझीलंडविरुद्ध ठरेल 'गेम चेंजर'

IND vs NZ 1st T20I: न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात एका घातक वेगवान गोलंदाजाने एंट्री केली आहे. या संपूर्ण मालिकेत हा खेळाडू गेमचेंजर ठरू शकतो.
ind vs nz 1st t20i This bowler will be a game changer against new zealand
ind vs nz 1st t20i This bowler will be a game changer against new zealand SAAM TV
Published On

IND vs NZ 1st T20 : भारत न्यूझीलंडविरुद्ध 27 जानेवारीपासून तीम सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत (India vs New Zealand 1st T20I) रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाची (Team India) धुरा हार्दिक पांड्याकडे असणार आहे. या मालिकसाठी भारतीय संघात एका घातक वेगवान गोलंदाजाने एंट्री केली आहे. या संपूर्ण मालिकेत हा खेळाडू गेमचेंजर ठरू शकतो.

या खेळाडूला मिळाली संधी

टी-२० विश्वचषकात आपली छाप उमटवणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला (Arshdeep Singh) न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी संघात स्थान मिळालं आहे. नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत अर्शदीप संघाचा भाग नव्हता. तसेच श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतही त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे या मालिकेत मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची अर्शदीपचा प्रयत्न असेल.

ind vs nz 1st t20i This bowler will be a game changer against new zealand
IND vs NZ, 1st T20I: कशी आहे रांचीची खेळपट्टी आणि हवामान? टॉस जिंकणारा संघ घेईल हा निर्णय

अर्शदीप सिंगची कारकिर्द

अर्शदीप सिंगने गेल्यावर्षी न्यूझीलंड दौऱ्यात एकदिवसीय सामन्यांत पदार्पण केले होते. या मालिकेतील तिन्ही सामन्यात अर्शदीपला खेळवण्यात आले होते, परंतु त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यानंतर त्याने एकही वनडे सामना खेळला नाही. या ऊलट अर्शदीपने खेळलेल्या 23 टी-20 सामन्यांमध्ये 8.42 च्या इकॉनॉमीने धावा देत 36 विकेट घेतल्या आहेत. आशिया कप 2022 आणि T20 विश्वचषक 2022 मध्ये अर्शदीप सिंगने चमकदार कामगिरी केली होती.

ind vs nz 1st t20i This bowler will be a game changer against new zealand
Ind vs NZ 1st T20I : टीम इंडियाने अक्षर-जडेजाला शोधला पर्याय, या घातक ऑलराउंडरची संघात एंट्री

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० साठी भारतीय संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com