मुंबई : वनडे सामन्याच्या मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा धुव्वा उडवल्यानंतर आता टीम इंडिया टी-20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडविरोधात 3 टी-20 सामने खेळणार आहे. मात्र, त्याआधीच टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, विस्फोटक सलामीवीर फलंदाज टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे. (Latest Marathi News)
वनडे सीरीजनंतर टीम इंडियाला (Team India) न्यूझीलंड विरुद्ध टी-20 सीरीज खेळायची आहे. हार्दिक पंड्या या सीरीजमध्ये टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे. पण सीरीज सुरू होण्याआधीच युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड हा जखमी झाला आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं आहे.
न्यूझीलंडविरोधातील टी-20 मालिकेत ऋतुराज गायकवाड हा टीम इंडियाचा भाग आहे. मात्र, तो अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. एका क्रिडा (Sport News) वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाडच्या मनगटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला नॅशनल क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आलं आहे.
पृथ्वी शॉला मिळणार संधी?
न्यूझीलंड विरुद्ध तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला येत्या 27 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. मात्र, त्याआधीच ऋतुराज गायकवाड अनफिट झाल्याने पृथ्वी शॉसाठी सलामीला येण्याचे दरवाजे उघडले आहेत. (India vs New Zealand)
मागील काही दिवसांपासून पृथ्वी शॉ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. मात्र, रणजी चषकात केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे त्याला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. पृथ्वी शॉ याआधी 2021 मध्ये श्रीलंका (Srilanka) दौऱ्यावर टीम इंडियाकडून शेवटचा सामना खेळला होता.
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़ (मालिकेतून बाहेर), दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.