Mohmmed Siraj: ICC ODI रॅंकिंगमध्ये सिराज 'राज'; दिग्गजांना धोबीपछाड देत पहिल्या स्थानावर विराजमान

Team India च्या दणदणीत विजयाचा जल्लोश सुरू असतानाच गोलंदाज मोहम्मद सिराजनेही एकदिवसीय रॅंकिंमध्ये पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे...
Mohmmed Siraj
Mohmmed SirajSaamtv
Published On

ICC Ranking: न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तीन एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने ३-० अशी जबरदस्त विजय साकारला. या विजयासोबतच भारतीय संघाने वनडेमध्ये पहिले स्थानही पटकावले आहे. आधी श्रीलंका आणि आता न्यूझीलंडला जोरदार धूळ चारत भारतीय संघाने आपणच वनडेचा बादशहा असल्याचा इशाराही दिला आहे.

टीम इंडियाच्या (Team India) या दणदणीत विजयाचा जल्लोश सुरू असतानाच गोलंदाज मोहम्मद सिराजनेही एकदिवसीय रॅंकिंमध्ये पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे.

Mohmmed Siraj
Daund Mass Death News : एकाच कुटुंबातील ७ जणांना कुणी आणि का संपवलं? हत्येचं कारण आलं समोर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेनंतर मोहम्मद सिराज आता जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. आयसीसीने ताजी वनडे रँकिंग जाहीर केली असून त्यात हा वेगवान गोलंदाज पहिल्या स्थानावर आहे. सिराजने गेल्या वर्षभरात शानदार गोलंदाजी केली असून त्याचे फळ त्याला अखेर मिळाले आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला मागे टाकून त्याने पहिले स्थान मिळवले. सिराज वनडे फॉरमॅटमध्ये प्रथमच नंबर वन बनला आहे.

Mohmmed Siraj
Kalyan News: क्वारंटाईन सेंटरमधून फरार आरोपी दोन वर्षानंतर अखेर जेरबंद

मोहम्मद सिराजने 2019 मध्ये वनडे पदार्पण केले पण काही काळानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सिराजने या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले आणि तेव्हापासून तो टीम इंडियाचा सर्वात विश्वासार्ह गोलंदाज राहिला आहे. पुनरागमन झाल्यापासून सिराजने 20 सामने खेळले असून त्यात 37 बळी घेतले आहेत. विशेषत: पॉवरप्लेमध्ये सिराज प्रत्येक फलंदाजाची डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

अलिकडेच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या (Srilanka) मालिकेत सिराजने नऊ विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात त्याने चार बळी घेतले होते. या मालिकेनंतर ७२९ रेटिंग गुणांसह सिराजने पहिले स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ७२७ अंकांसह दुसऱ्या आणि न्यूझीलंडचा टेंट बोल्ट तिसऱ्या स्थानावर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com