icc saam tv
Sports

ICC Announces New Rules: क्रिकेटच्या नियमांमध्ये ३ मोठे बदल! कट्टर क्रिकेट फॅन्सने जाणून घ्यायलाच हवं

ICC New Rules In Cricket: आयसीसीने ३ मोठ्या नियमांमध्ये बदल केला केला आहे. कोणते आहेत ते ३ नियम? जाणून घ्या.

Ankush Dhavre

ICC: सध्या भारतात आयपीएल २०२३ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धंच अंतिम सामना येत्या २८ मे रोजी रंगणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या मोठ्या सामान्यापूर्वी आयसीसीने ३ मोठ्या नियमांमध्ये बदल केला केला आहे. कोणते आहेत ते ३ नियम? जाणून घ्या.

आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पुरुष क्रिकेट समिती आणि महिला क्रिकेट समितीच्या शिफारशींना मान्यता देत क्रिकेटच्या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत.

सॉफ्ट सिग्नल रद्द..

यापूर्वी क्षेत्ररक्षण करणारा संघ जेव्हा झेलबादची किंवा धावबादची मागणी करायचा, त्यावेळी अंपायर तिसऱ्या अंपायरकडे निर्णय पाठवण्यापूर्वी सॉफ्ट सिग्नल द्यायचे. त्यामुळे व्हायचं की क्लोज कॉल असल्यास अंपायरने दिलेल्या सॉफ्ट सिग्नलच्या आधारे निर्णय दिला जायचा. त्यामुळे अनेकदा चुकीचे निर्णय देखील दिले गेले आहेत.

हे थांबवण्यासाठी आता सॉफ्ट सिग्नलचा नियम रद्द करण्यात आला आहे. आता निर्णय थेट तिसऱ्या अंपायरकडे पाठवला जाणार आहे. याबाबत बोलताना सौरव गागुंली म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेट समितीची बैठक झाली त्यावेळी सॉफ्ट सिग्नलवर चर्चा झाली आहे." (Latest sports update in marathi)

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय...

क्रिकेटच्या नियमांमध्ये आणखी एक मोठा बदल म्हणजे खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा बदल करण्यात आला आहे. फलंदाज हेल्मेट घालून मैदानात उतरत असतात. तर काही वेळा फलंदाज हेल्मेट काढून खेळण्याचं धाडस करतात.

आता आयसीसीने लागु केलेल्या नव्या नियमानुसार, फलंदाजाला हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे. तसेच यष्टिरक्षण करत असताना देखील हेल्मेट घालून यष्टिरक्षण करणं आता बंधनकारक असणार आहे.

कारण यष्टीरक्षक जेव्हा जवळून यष्टिरक्षण करतो त्यावेळी चेंडू किंवा बेल्स लागून दुखापतग्रस्त होण्याचा धोका अधिक असतो. यापूर्वी अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू मार्क बाऊचर हेल्मेट न घालता यष्टिरक्षण करत होता, त्यावेळी फलंदाज तत्रिफळाचित होऊन बेल्स त्याच्या डोळ्याला लागली होती. त्यामुळे त्याची कारकीर्द संपुष्ठात आली होती.

तसेच जे खेळाडू शॉट लेग किंवा फलंदाजाच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षणासाठी उभे राहतात त्यांना देखील हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे.

फ्री हिट बाबत घेतला मोठा निर्णय.

यापूर्वी फ्री हिटच्या चेंडूवर चेंडू यष्टीला जाऊन धडकल्यास मिळणाऱ्या धावा या संघाला मिळत होत्या. आता या नियमात बदल करण्यात आला आहे. आता पासून या धावा त्या फलंदाजाच्या खात्यात जाणार आहेत. हे सर्व नियम १ जुन पासुन लागु केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistani Celebrities Banned in India: भारताने 'या' पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवर २४ तासांत पुन्हा घातली बंदी

Maharashtra Live News Update: कन्नड नगर परिषदेची दुमजली इमारत कोसळली

Leftover Rice: शिळा भात खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

Late Night Awake: तुम्हालाही रात्री उशिरा पर्यंत जाग राहण्याची सवय आहे? वेळीचं व्हा सावधान नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Dhule Crime : वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावत मित्राचा घातपात; कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, नातेवाईक संतप्त

SCROLL FOR NEXT