team india twitter
Sports

Team India: पत्नी अन् मुलांना सोबत ठेवता येणार, पण ही आहे अट; BCCI ने खेळाडूंसाठी नियम बदलला

BCCI Changed Family Rule For Players: बीसीसीआयने बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीनंत खेळाडूंसाठी कडक नियम लागू केले होते. मात्र आता खेळाडूंना थोडी सूट देण्यात आली आहे.

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेट संघासाठी गेली काही महिने वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. आधी न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली.त्यानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सुपरफ्लॉप कामगिरीनंतर बीसीसीआयने १० सुत्री नियम लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

यापैकी सर्वात मोठा नियम म्हणजे, मोठ्या दौऱ्यावर असताना, खेळाडूंना पूर्णवेळ आपल्या कुटुंबाला घेऊन जाता येणार नाही. याची अंमलबजावणी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपासून करण्यात आली आहे.

भारतीय संघातील खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ फेब्रुवारीला दुबईत दाखल झाले आहेत. यावेळी खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबातील सदस्य दिसून आले नव्हते. मात्र बीसीसीआयने या नियमात थोडी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघातील खेळाडूंना आपल्या कुटुंबातील सदस्यांना सोबत ठेवण्याची अनुमती दिली जाणार नाही. मात्र बीसीसीआयने आता सुट दिली आहे.

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने केवळ एका सामन्यासाठी कुटुंबातील सदस्यांना सोबत ठेवण्याची अनुमती दिली आहे. नुकताच बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असल्याचं म्हटलं जात आहे.

बीसीसीआयला आधीच सांगावं लागणार

बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं होतं की, कमी दिवसांचा दौरा असल्यास खेळाडूंना कुटुंबासोबत राहता येणार नाही. मात्र आता केवळ एका सामन्यासाठी सोबत राहण्याची अनुमती देण्यात आली आहे. खेळाडू कुठल्या सामन्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांना बोलवणार आहेत, हे त्यांना आधीच सांगावं लागणार आहे.

अधिकाऱ्यांनी ही सूट दिलीये की खेळाडूंनी मागणी केली होती, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. बीसीसीआयने ठरवून दिलेल्या नियमावलीनूसार, जर भारतीय संघ ४५ दिवसांपेक्षा अधिकच्या दौऱ्यावर जात असेल, तर खेळाडू २ आठवडे आपल्या कुटुंबातील सदस्यांना सोबत ठेवू शकतात. जर दौरा त्याहून कमी असेल तर खेळाडू केवळ १ आठवडा आपल्या कुटुंबातील सदस्यांना सोबत ठेवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : ए डुबे देख; संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

SCROLL FOR NEXT