Champions Trophy: टीम इंडियाला मोठा धक्का! महत्वाचा शिलेदार मायदेशी परतला

Morne Morkel Return To South Africa, Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना १९ फेब्रुवारीला रंगणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
Champions Trophy: टीम इंडियाला मोठा धक्का! महत्वाचा शिलेदार मायदेशी परतला
mohammed shamisaam tv
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ भिडणार आहेत.

त्यानंतर भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना २० फेब्रुवारीला रंगणार आहे. या स्पर्धेसाठी आठही संघांनी कंबर कसली आहे. दरम्यान स्पर्धेच्या १ दिवसापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

Champions Trophy: टीम इंडियाला मोठा धक्का! महत्वाचा शिलेदार मायदेशी परतला
Champions Trophy: ना रोहित, ना विराट.. हा एकटा खेळाडू टीम इंडियाला चॅम्पियन बनवणार

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे असले, तरीदेखील हायब्रिड मॉडेलनूसार भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू दुबईत पोहोचले असून कसून सराव करायला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान स्पर्धेच्या १ दिवसाआधी संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल मायदेशी परतला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, मॉर्ने मॉर्केलच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्याला तडकाफडकी मायदेशी परतावं लागलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी महत्वाची स्पर्धा सुरु असताना गोलंदाजी प्रशिक्षक संघाची साथ सोडून जाणं ही भारतीय संघासाठी धोक्याची घंटा आहे.

Champions Trophy: टीम इंडियाला मोठा धक्का! महत्वाचा शिलेदार मायदेशी परतला
Champions Trophy : पाकिस्तान कधी सुधारणारच नाही; स्टेडियमवर भारताचा झेंडा फडकावला नाही, चाहते म्हणाले...

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येण्यापूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या मालिकेदरम्यान मॉर्केल संघासोबत भारतात होता. त्यानंतर १५ फेब्रुवारीला तो भारतीय संघासोबत दुबईत दाखल झाला. त्यानंतर १६ फेब्रुवारीला त्याने भारतीय संघासोबत सराव केला.

मात्र १७ फेब्रुवारीला तो भारतीय संघासोबत सराव करताना दिसून आला नव्हता. तो दक्षिण आफ्रिकेला परतला आहे. तो दुबईत केव्हा परतणार याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही . भारतीय संघाला २३ फेब्रुवारीला अतिशय महत्वाचा असा सामना खेळायचा आहे. या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानचा सामना करताना दिसून येणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्यासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात

भारतीय संघाची वनडे क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहता, भारताला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारतीय संघाने आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. या स्पर्धेतील सर्व सामने जिंकून भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली आहे. आता साखळी फेरीतील ३ सामने जिंकून भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यानंतर फायनल जिंकून भारतीय संघ दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान पटकावण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com