icc announced prize money for icc odi world cup 2023 know how much winnner and runner up team will get Saam tv news
Sports

World Cup Prize Money: वर्ल्डकप स्पर्धेत विजेता, उपविजेता संघ होणार मालामाल; ICC कडून बक्षिसांची यादी जाहीर

ICC World Cup 2023 Prize Money: आयसीसीकडून यादी जाहीर करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

World Cup Prize Money:

आगामी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना येत्या ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने बक्षिसाची रक्कम जाहिर केली आहे.

पराभूत होणाऱ्या संघावरही होणार बक्षिसाचा वर्षाव..

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा जिंकणाऱ्या संघावर पैशांचा वर्षाव केला जाणार आहे. स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या संघाला ३३ कोटी १७ लाख रूपये इतकी रक्कम मिळणार आहे. तर उपविजेत्या संघाला १६ कोटी ५८ लाख रुपये इतकी रक्कम बक्षिस म्हणून दिली जाणार आहे.

वर्ल्डकप स्पर्धेतील एक सामना जिंकणाऱ्या संघाला ४० हजार डॉलर इतकी रक्कम बक्षिस म्हणून दिली जाणार आहे. तर साखळी फेरीतून बाहेर पडणाऱ्या संघाला १ लाख डॉलर इतकी रक्कम दिली जाणार आहे. (Latest sports updates)

सेमीफायनलमध्ये जाणाऱ्या संघाला किती मिळणार?

वर्ल्डकप स्पर्धेची सेमीफायनल गाठणाऱ्या संघावरही बक्षिसाचा वर्षाव केला जाणार आहे. टॉप ४ संघांना बक्षिस म्हणून ८ लाख डॉलर इतकी रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे वर्ल्डकप खेळणाऱ्या प्रत्येक संघाला बक्षिस मिळणार हे निश्चित आहे.

या स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध रंगणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT