KL Rahul Statement, India vs Australia 1st ODI:
केएल राहुलच्या विजयी षटकाराने भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २७६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने ८ चेंडू आणि ५ गडी राखून हे आव्हान पूर्ण केलं.
तब्बल २७ वर्षानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मोहालीच्या मैदानावर धूळ चारली आहे. या विजयानंतर केएल राहुलने मोठं वक्तव्य केलं आहे.
सामन्यानंतर बोलताना केएल राहुल म्हणाला की, ' गेले काही दिवस आम्ही आशिया चषकातील सामने कोलंबोच्या मैदानावर खेळत होतो. इथे खेळणं सुःखद अनुभव होता. इथे दुपारी खूप उन होतं.अशा स्थितीत खेळणं शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक होतं. मात्र आम्ही फिटनेसवर खूप भर दिला आहे. जे मैदानातील कामगिरीवरून दिसून येतं. आम्ही ५ गोलंदाजांसह मैदानात उतरलो होतो. त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाला १०-१० षटके गोलंदाजी करायची होती. '
संघातील फलंदाजांबद्दल बोलताना तो म्हणाला की, ' शुबमन गिल बाद झाल्यानंतर संघ अडचणीत आला होता. मात्र मी आणि सूर्यकुमार यादव दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप झाली. या आव्हानात्मक स्थितीत मी स्वतः कशी कामगिरी करू शकतो, हे मला पहायचं होतं.' (Latest sports updates)
' फलंदाजी करताना आम्ही दोघे एकमेकांसोबत चर्चा करत होतो. आम्हाला चांगल्याने माहीत होतं की, केव्हा मोठे फटके खेळायचे आहे आणि केव्हा स्ट्राईक रोटेट करायची आहे. हे असं डिपार्टमेंट आहे ज्यावर संघातील सर्वच फलंदाज काम करत आहेत. आम्हाला हा सामना शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जायचा होता.' असं केएल राहुल म्हणाला.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २७६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ८ चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.