Fan letter to Rohit Sharma saam tv
Sports

Rohit Sharma: माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला मदत कर...; फॅनचं हिटमॅनला खास पत्र, आता काय करणार रोहित शर्मा?

Fan letter to Rohit Sharma: एका चाहत्याने तर सुरक्षा तोडून रोहितला मैदानात भेटण्याचा प्रयत्न केला. यानंतर 15 वर्षीय छाब्रियाकडून एक मेसेज मिळाला, ज्याने भारतीय स्टारला महान फलंदाज म्हटलंय.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. रणजी सामन्यात देखील मुंबईच्या टीममधून खेळताना त्याला काही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. दरम्यान या सामन्यानंतर रोहित शर्माला एका चाहत्याने खास पत्र लिहिलं आहे. एका १५ वर्षीय मुलाने रोहितला हे पत्र लिहिलं असून यथार्थ छाब्रिया नावाच्या चाहत्याच्या म्हणण्यानुसार, तो रोहित शर्मामुळेच क्रिकेट पाहतो. यावेळी या चाहत्याने आपल्या स्टारला मदतीची विनंती केली आहे.

अनेक वर्षांनंतर रोहित शर्माने रणजी सामन्यात कमबॅक केलं. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून सामना खेळताना रोहित शर्माची कामगिरी चांगली झाली नाही. त्याने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 28 रन्स केले. भारतीय कर्णधाराची एक झलक पाहण्याची चाहत्यांची क्रेझ शिगेला पोहोचली होती. एका चाहत्याने तर सुरक्षा तोडून रोहितला मैदानात भेटण्याचा प्रयत्न केला. यानंतर 15 वर्षीय छाब्रियाकडून एक मेसेज मिळाला, ज्याने भारतीय स्टारला महान फलंदाज म्हटलंय.

चाहत्याने पत्रामध्ये काय लिहिलंय?

छोट्या चाहत्याने रोहितसाठी लिहिलंय की, “माझा आदर्श, माझा आवडता खेळाडू आणि सर्वकाळातील महान फलंदाज. मला माहित आहे की, मी हे देशातील लाखो लोकांकडून बोलतोय. मी हा गेम पाहण्याचे कारण केवळ तू आहे. ज्या काळात मी तुझी उत्कृष्ट फलंदाजी पाहू शकतो त्या काळात जन्म घेणं मी माझं खूप भाग्यवान समजतो.”

चाहत्याने पुढे लिहिलंय की, “फॉर्म तात्पुरता आहे, पण क्लास कायम आहे. तू अलीकडे कोणतीही मोठी खेळी खेळली नसशील, मात्र त्याने काही फरक पडत नाही. तू योग्य मार्गावर आहेस आणि तू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विरोधी टीम्सविरूद्ध चांगली कामगिरी करशील. तुझे लागवलेले ३ सिक्स अप्रतिम होते. मी गणिताची शिकवणी सुरू असताना सामना पाहिला, पण खरंच हा सामना तितका दमदार होता आणि चालू वर्गात तो पाहणंसुद्धा मार्गी लागलं.

निवृत्ती घेऊ नकोस

“द्वेष करणारे द्वेष करतील. परंतु तुझं नेतृत्व उत्तम आहे. तू मैदानावरील सर्वोत्तम खेळाडू असून प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळाडू आणि कर्णधार म्हणून यश मिळवलंयस. मी नेहमी तुझं अनुसरण केलं आहे. प्रत्येक सामना फक्त तुझ्यासाठी पाहतो. कृपया कधीही निवृत्त होऊ नकोस. टीव्ही चालू केल्यावर आणि तुला मैदानात ओपन करण्यासाठी बाहेर येताना पाहून मला कसं वाटेल याची मी कल्पनाही करू शकत नाही."

रोहित शर्माकडून मागितली खास मदत

यथार्थ छाब्रियाने लिहिले की, “मी १५ वर्षांचा महत्वाकांक्षी मुलगा आहे. क्रीडा विश्लेषक होण्याचं माझं स्वप्न आहे. मी राजस्थान रॉयल्समध्ये इंटर्नशिपही पूर्ण केली आहे. तू मला कोणत्याही प्रकारे मदत करू शकत असल्यास मला कळवा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. रोहित आणि मला माहित आहे की तू लवकरच तुझ्या सर्वोत्तम क्षमतेवर कमबॅक करशील.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT