ben stokes twitter
Sports

Ben Stokes Statement: 'हे आहे तरी काय...' रांचीची खेळपट्टी पाहून बेन स्टोक्स हादरला, म्हणाला...

India vs England 4th Test Pitch Report: मालिकेतील चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून रांचीतील JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठीची खेळपट्टी पाहून इंग्लंडच्या कर्णधार बेन स्टोक्सला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

IND vs ENG 4th Test, Ben Stokes Statement:

भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत दमदार कामगिरी करतोय. राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने ४३४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. दरम्यान मालिकेतील चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून रांचीतील JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठीची खेळपट्टी पाहून इंग्लंडच्या कर्णधार बेन स्टोक्सला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

रांचीची खेळपट्टी लांबून पाहिली तर, ही खेळपट्टी हिरवीगार दिसते. मात्र जवळून पाहिलं असतान तर खेळपट्टीवर भेगा असल्याचं दिसून येत आहे. खेळपट्टीबाबत बोलताना बेन स्टोक्स म्हणाला की,' मी अशी खेळपट्टी यापुर्वी कधीच पाहिली नव्हती. मला याबाबत काहीच कल्पना नाही. त्यामुळे खेळपट्टी कोणाला साथ देणार याबाबत काहीच सांगता येत नाही. तुम्ही जर खेळपट्टीचा एक भाग पाहिला तर तो वेगळा दिसतोय,तर दुसरा भाग वेगळाच दिसतोय.' (Cricket news in marathi)

तसेच तो पुढे म्हणाला की,' मी भारतात यापूर्वी अशा खेळपट्या कधीच पाहिलेल्या नाहीत. ड्रेसिंग रुममधून पाहिलं तर ही खेळपट्टी वेगळी दिसते. मात्र खेळपट्टीच्या जवळ गेलं की, खेळपट्टीवर भेगा दिसून येतात.' रांचीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरते. त्यामुळे या कसोटीसाठी इंग्लंडने शोएब बशीरचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला आहे. तर रेहान अहमदला बाहेर बसवलं आहे.

या सामन्यासाठी अशी आहे इंग्लंडची प्लेइंग ११:

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पॉप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हर्टली, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, शोएब बशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Farmer : सरकारने जमा केलेली रक्कम शेतकऱ्यांने केली परत; अतिवृष्टीची तुटपुंजी मदत दिल्याने शेतकरी संतप्त

Amruta Khanvilkar Tattoo: अभिनेत्री अमृता खानविलकरच्या हातावर गोंदवलेला खास टॅटू कोणत्या व्यक्तीचा आहे?

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

SCROLL FOR NEXT