shreyas iyer twitter
Sports

Shreyas Iyer: 'मला ती ओळख मिळालीच नाही..', भारताला चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूने व्यक्त केली खदखद

Shreyas Iyer News In Marathi: भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपद मिळवून दिलं होतं. मात्र तरीदेखील त्याला हवी तितकी ओळख मिळालेली नाही, असं त्याचं म्हणणं आहे.

Ankush Dhavre

भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर सध्या तुफान चर्चेत आहे. चर्चेत असण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत केलेली कामगिरी. भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात श्रेयस अय्यरने अतिशय मोलाची भूमिका बजावली.

यासह कोलकाता नाईट रायडर्स संघाला चॅम्पियन बनवण्यातही श्रेयसचा मोलाचा वाटा आहे. मात्र त्याला हवी तितकी ओळख मिळाली नसल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे. आगामी हंगामात तो पंजाब किंग्ज संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस अय्यर म्हणाला, ' मला वैयक्तिकरित्या असं वाटलं की, आयपीएल स्पर्धा जिंकूनही मला अपेक्षा होती तितकी ओळख मिळाली नाही. मात्र शेवटी तुमच्यात आत्मसन्मान असेल आणि तुम्ही चांगलं काम करणं सुरु ठेवता, हेच जास्त महत्वाचं आहे. मी तेच करत राहिलो.'

श्रेयस अय्यर गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व करत होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. आगामी हंगामापू्र्वी त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. या हंगामासाठी पंजाब किंग्जने त्याला २६.७५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी

गेल्या हंगामात त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाचा आठवा कर्णधार होण्याचा मान मिळाला होता. या हंगामात त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनवलं होतं. या संघाने फायनलमध्ये सनरायझर्स संघाला हरवून जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात त्याला पंजाब किंग्जने २६.७५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं.

नवा संघ नवीन आव्हान

पंजाब किंग्ज संघ हा श्रेयस अय्यरच्या आयपीएल कारकिर्दीतील तिसरा संघ असणार आहे. यापूर्वी २०१५ मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसून आला होता. याच संघाकडून त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. २०१८ मध्ये त्याला या संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. २०२० मध्ये त्याने पहिल्यांदाच दिल्लीला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सलाही फायनलमध्ये पोहोचवलं. त्यामुळे तो आगामी हंगामात पंजाबला ही स्पर्धा जिंकून देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुतीची घोषणा होताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट

मोठी बातमी! पुण्यानंतर आणखी एक शहरातील शाळांना सुट्टी जाहीर, कारण काय?

Bus Accident: वऱ्हाडाला घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत; दोन-तीन जणांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अखेर ठरलं! ZPत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, निवडणुकीसाठी रणनीती ठरली

SCROLL FOR NEXT