Ind vs Nz Final : ४ फुट हवेत उडाला, फिलिप्सने एका हाताने पकडला भन्नाट कॅच, व्हिडीओ व्हायरल

Ind vs Nz Match : भारत विरुद्ध न्यूझीलंडचा निर्णायक सामना दुबईत खेळला जात आहे. या सामन्यामध्ये ग्लेन फिलिप्सने पुन्हा एकदा त्याचे कौशल्य दाखवले. त्याने हवेत उडी मारुन अशक्य वाटेल अशी कॅच पकडली.
Ind vs Nz Final
Ind vs Nz FinalSaam Tv
Published On

Ind Vs Nz Live Final : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यामध्ये टॉस जिंकत न्यूझीलंडने फलंदाजी केली. त्यांनी ५० ओव्हर्समध्ये २५१ धावा केल्या. न्यूझीलंडची फलंदाजी संपल्यानंतर टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर मैदानात उतरले. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये त्यांनी तुफानी खेळी केली.

मैदानात उतरल्यानंतर रोहित शर्मा आणि शुबमन गिल चांगला खेळ करत होते. अशातच अठराव्या ओव्हरमध्ये कॅचआऊट झाला. त्यावेळेस मिचेल सँटनर गोलंदाजी करत होता. गिलने शॉट मारल्यानंतर बॉल ग्लेन फिलिप्सच्या दिशेने गेला. तेव्हा फिलिप्सने उडी मारुन वायूवेगाने बॉल डाव्या हाताने पकडला.

Ind vs Nz Final
Ind Vs Nz Live : कॅमेरामॅन जोमात, प्रेक्षक कोमात; फायनलमध्ये खेळाडूंपेक्षा या गोष्टींची होतेय चर्चा

ग्लेन फिलिप्सच्या उकृष्ट फिल्डिंगमुळे फॉर्ममध्ये येत असलेला शुबमन गिल फक्त ३१ धावांवर बाद झाला. ग्लेन फिलिप्सने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय चाहत्यांनीही या कॅचचे कौतुक केले आहे. काहींनी फिलिप्स हवेत उडतो असे म्हटले आहे. तर काहीजणांनी त्याला सध्याचा जगातला सर्वात उत्कृष्ट फिल्डर म्हटले आहे.

Ind vs Nz Final
Ind vs Nz Live : धोनीचा बदला विराटने घेतला, सँटनर आऊट होताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण

ग्रुप स्टेजमध्ये ज्यावेळेस भारत आणि न्यूझीलंड आमने-सामने आले होते. त्यावेळेस ग्लेन फिलिप्सच्या फिल्डिंगमुळे विराट कोहली बाद झाला होता. त्या सामन्यामध्ये विराटला फक्त ११ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात विराट फिलिप्सच्या कचाट्यात सापडला होता, आजच्या सामन्यात शुबमन गिल फिलिप्समुळे लवकर बाद झाला.

Ind vs Nz Final
Yuzvendra Chahal : धनश्री वर्मानंतर युजवेंद्र चहल तरुणीच्या प्रेमात? फायनल मॅचमध्ये दिसली 'मिस्ट्री गर्ल'ची झलक, फोटो व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com