Bus Accident: वऱ्हाडाला घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Jharkhand Bus Accident: झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात प्रवासी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Jharkhand Bus Accident
Rescue operations underway after a passenger bus plunged into a gorge in Latehar district, Jharkhand.saam tv
Published On
Summary
  • झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात भीषण बस अपघात

  • लग्न समारंभासाठी जाणारी प्रवासी बस दरीत कोसळली

  • अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील महुआतांड येथे वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झालाय तर २५ जण जखमी झालेत. हाती आलेल्या माहितीनुसार, बसमध्ये ८० प्रवासी होते, ते हे एका लग्न समारंभासाठी बलरामपूरहून महुआदंडकडे जात होते. वाटेत एका धोकादायक वळणावर बस उलटली आणि दरीत कोसळली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णायात दाखल करण्यात आले आहे.

Jharkhand Bus Accident
shocking: असं दुःख कोणाच्याही वाट्याला नको! मुलानं MISS U PAPA स्टेटस ठेवलं, २१ तासांनी मृत्यूनं गाठलं

मिळालेल्या माहितीनुसार, बस छत्तीसगडमधील बलरामपूरहून लोध फॉल्सकडे जात होती. तर बसमधील प्रवासी छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. ओरसा येथील एका धोकादायक वळणावर बस आली असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ हून अधिक जण जखमी झालेत.

Jharkhand Bus Accident
Pune Tempo Accident: पुण्यात अपघाताचा थरार! अनियंत्रित टेम्पोची फुटपाथवरील अनेक वाहनांना धडक

अपघात घडल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर महुआतांड पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. तसेच स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी मनोज कुमार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे. अपघातात २५ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधून ८० प्रवाशी प्रवास करत होते. आतापर्यंत पाच महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बसखाली आणखी मृतदेह असण्याची भीती व्यक्त केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com