KKR Captain: केकेआरचा कॅप्टन ठरला! मराठमोळ्या खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी

Ajinkya Rahane Named As KKR Captain: कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.
KKR Captain: केकेआरचा कॅप्टन ठरला! मराठमोळ्या खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी
Kolkata knight riderstwitter
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पाकिस्तान आणि दुबईत सुरु असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा झाल्यानंतर क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. दरम्यान या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाने नव्या कर्णधार आणि उपकर्णधाराची घोषणा केली आहे. अजिंक्य रहाणेची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर वेंकटेश अय्यरची उपकर्णधार म्हणून निवड केली आहे.

KKR Captain: केकेआरचा कॅप्टन ठरला! मराठमोळ्या खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी
IPL 2025: आता IPL मध्ये रेड बॉलने खेळावं लागणार? काय आहे BCCI चा नवा प्लान?

अजिंक्य रहाणेकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाची जबाबदारी सोपवल्यानंतर केकेआरचे CEO व्हेंकी मॅसूर, म्हणाले, "आम्हाला अजिंक्य रहाणेसारखा अनुभवी आणि परिपक्व नेतृत्वगुण असलेला खेळाडू संघात घेण्याचा आनंद आहे. तसेच, वेंकटेश अय्यर हा केकेआरसाठी महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे आणि त्याच्यातही उत्तम नेतृत्वगुण आहेत. आम्हाला विश्वास आहे की ते दोघे मिळून उत्तम समन्वय साधतील आणि आमच्या विजेतेपदाच्या बचावाची सुरुवात भक्कम करतील."

तसेच कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारताना अजिंक्य रहाणे म्हणाला, ' केकेआरचे नेतृत्व करण्यासाठी निवडले जाणे ही माझ्यासाठी मोठा सन्मानाची बाब आहे. केकेआर हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. माझ्या मते, आमच्याकडे अत्यंत उत्कृष्ट आणि संतुलित संघ आहे. मी सर्वांसोबत काम करण्यास उत्सुक आहे आणि आमच्या विजेतेपदाच्या बचावाचे आव्हान स्वीकारण्यास तयार आहे.

या स्पर्धेसाठी असाआहे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ:

फलंदाज

रिंकू सिंग

क्विंटन डी कॉक (द. आफ्रिका)

अंगक्रिश रघुवंशी

रहमानुल्लाह गुरबाज ( अफगाणिस्तान)

मनीष पांडे

लवनीत सिसोदिया

अजिंक्य रहाणे

ऑल राउंडर

सुनील नरेन (वेस्ट इंडिज)

आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज)

रमनदीप सिंग

वेंकटेश अय्यर

रोव्हमन पॉवेल (वेस्ट इंडिज)

मोईन अली (इंग्लंड)

गोलंदाज

वरून चक्रवर्ती

हर्षित राणा

ऑनरिक नॉर्खिया (द. आफ्रिका)

वैभव अरोरा

मयंक मार्कंडे

स्पेन्सर जॉन्सन ( ऑस्ट्रेलिया)

अनुकूल रॉय

उमरान मलिक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com