babar azam  twitter
क्रीडा

Babar Azam Retirement: 'मी निवृत्ती घेतोय...' बाबर आझमचा कसोटी क्रिकेटला रामराम? पोस्ट व्हायरल

Ankush Dhavre

पाकिस्तान संघातील प्रमुख फलंदाज बाबर आझम फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसतोय. विराट कोहलीशी तुलना केली जाणारा बाबर आझमला आपल्याच मायदेशात धावा करताना घाम फुटतोय.

बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत तर तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तानी फॅन्सने त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. दरम्यान बाबर आझमने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाकिस्तानचा संघ आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये सहाव्या स्थानी आहे. तर बांगलादेशचा संघ ९ व्या स्थानी आहे. बांगलादेशचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तानचा संघ पराभवाच्या वाटेवर आहे. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स संतप्त प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

बाबर आझम पूर्णपणे फ्लॉप

बाबर आझम (Babar Azam) हा पाकिस्तान संघातील प्रमुख फलंदाज आहे. मात्र बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. या मालिकेत त्याला अवघ्या ६४ धावा करता आल्या आहेत. यादरम्यान ३१ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

बाबर आझमने घेतली निवृत्ती?

सोशल मीडियावर बाबर आझमला जोरदार ट्रोल केलं जात आहे. बाबर आझम पॅरोडी अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यावर,' मी निवृत्ती जाहीर करतोय. जेव्हा मी कर्णधार होतो, तेव्हा मी क्यूरेटरला बॅटींग फ्रेंडली पिच बनवायला सांगायचो. त्यामुळे मला धावा करणं सोपं जायचं.

आता मी कर्णधार नाहीये, त्यामुळे मी क्यूरेटरला बॅटींग फ्रेंडली पिच बनवण्यासाठी सांगू शकत नाहीये. त्यामुळे माझी कामगिरी ढासळली आहे.' असं लिहिण्यात आलं आहे. हे बाबर आझमचं पॅरोडी अकाऊंट असून नेटकरी त्याला जोरदार ट्रोल करताना दिसून येत आहेत. दरम्यान आणखी काही मिम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT