Babar Azam Record: बाबरचा 'विराट' कारनामा मोठ्या विक्रमात सचिनलाही मागे सोडत रचला इतिहास

Babar Azam Records: बाबर आजमने सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडून काढला आहे.
babar azam
babar azamsaam tv
Published On

PAK VS NZ ODI Series: पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ५ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. गुरुवारी या मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाने ७ गडी बाद २८८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने ५ गडी राखून जोरदार विजय मिळवला.

यासह पाकिस्तान संघाने य मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजमने सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडून काढला आहे.

पाकिस्तानच्या कर्णधाराने रचला इतिहास

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजमने न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात ४९ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

बाबर आजम आता सर्वात जलद १२ हजार धावा पूर्ण करणारा आशिया खंडातील दुसराच फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने जावेद मियांदाद आणि सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकलं आहे.

मात्र तो विराट कोहलीला या विक्रमात मागे सोडण्यास अपयशी ठरला आहे. विराट कोहलीने २७६ डावांमध्ये हा विक्रम केला होता. तर बाबर आजमने हा पराक्रम २७७ डावांमध्ये केला आहे. (Latest sports updates)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२ हजार धावा करणारे फलंदाज (आशिया खंडातील)

विराट कोहली- २७६ डावात

बाबर आजम - २७७ डावात

जावेद मियांदाद - २८४ डावात

सचिन तेंडुलकर- २८८ डावात

सुनील गावसकर -२८९ डावात

कोणी केल्या आहेत सर्वात जलद १२ हजार धावा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२ हजार धावा करण्याचा विक्रम हा वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज विव रिचर्ड्सच्या नावे आहे. विव रिचर्ड्स यांनी २५५ डावांमध्ये १२ हजार धावा करण्याचा पराक्रम केला होता.

तर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आम्लाने २६४ डावांमध्ये १२ हजार धावांचा पल्ला गाठला होता. तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने २६९ डावांमध्ये १२ हजार धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com