करोडो भारतीयांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया विश्वविजयी होण्यासाठी सज्ज झालीय. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. विश्वचषकाचा हा थरार घरबसल्या अनुभवता येणार आहे. कधी अन् कुठे पाहाल हा सामना? जाणून घ्या.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत एकहाती वर्चस्व गाजवताना साखळी फेरीतील नऊ आणि उपांत्य फेरी असे एकूण १० सामने जिंकले आहेत. आज या विश्वचषकातील अंतिम सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता सामना सुरू होईल.
विश्वचषकाचा अंतिम सामना मोबाईलवर पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक रुपयाही मोजावा लागणार नाही. डिस्ने प्लस हॉटस्टार तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता. तसेच जर तुम्ही लॅपटॉपवर मॅच पाहणार असाल तर हॉटस्टारवर सामना पाहण्यासाठी पैसे द्यावे लागतील. स्टार स्पोर्ट्स चॅनलद्वारे तुम्ही या सामन्याचा ऑफलाइन आनंद घेऊ शकता. स्टार स्पोर्ट्स जवळजवळ प्रत्येक भाषेत सामन्यांचे प्रसारण करत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, शार्दूल ठाकूर, प्रसिध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, अॅडम झँम्पा, कॅमरून ग्रीन, मार्कस स्टोइनिस, अॅलेक्स कॅरी, शॉन अॅबट. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.