भारत आणि ऑस्टेलिया संघामध्ये आज वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाला नमवून विश्वचषक उंचावण्यासाठी रोहित सेना सज्ज झाली असून करोडो भारतीयांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला पंतप्रधान मोदी हजेरी लावणार आहेत. यावरुनच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
"पुर्वी मुंबई ही क्रिकेटची पंढरी होती. अशा प्रकारचे खेळांचे उत्सव मुंबई, दिल्ली किंवा ईडन गार्डनला व्हायचे. मात्र आता मुंबईतून संपूर्ण क्रिकेट हे अहमदाबादला हालवण्यात आलयं. कारण त्यांना राजकीय इव्हेंट करायचा आहे..." असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.
तसेच "आज जर आपण जिंकलो तर मोदी थे इसलिए हम जित गये. मोदी है तो वर्ल्डकपकी जीत मुमकीन है असं होणार, पाहत राहा असे संजय राऊत म्हणाले. पुर्वी खेळ हा खेळ होता, पण तो सुद्धा आता भाजपचा (BJP) इव्हेंट झालायं. खेळालाही त्यांनी सोडले नाही.." अशी टीकाही राऊतांनी केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या टीम इंडियाला शुभेच्छा...!
दरम्यान, आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन विश्वचषकावर नाव कोरण्यास टीम इंडिया सज्ज झाली आहे. सामना विजयी होण्यासाठी कोट्यवधी भारतीय प्रार्थना करत आहेत. माजी कॉंग्रेस अध्यक्षा जेष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनीही भारतीय संघाला ट्वीट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी 1983 आणि 2011 च्या विश्वचषक विजयाच्या आठवणीही सांगितल्या. "क्रिकेट आपल्या देशाला जोडण्याचे काम करते. आज संपूर्ण देश फायनलसाठी तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुम्हाला यशासाठी शुभेच्छा देतो. टीम इंडिया विश्वचषक जिंकेल असा मला पूर्ण विश्वास आहे.." अशा खास शुभेच्छा दिल्या आहेत. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.