lsg vs mi
lsg vs mi saam tv
क्रीडा | IPL

MI Playoff Scenario: लखनऊच्या विजयानं वाढली मुंबईची चिंता! आता १ स्पॉटसाठी ३ संघांमध्ये लढत

Ankush Dhavre

IPL Points Table: रविवारी आयपीएल स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाला धूळ चारत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पराभव करत प्लेऑफमध्ये धडक दिली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने १ धावेने विजय मिळवला आहे. दरम्यान या विजयानंतर ३ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तर १ स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ भिडणार आहे.

मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल?

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचा प्रत्येकी १-१ सामना शिल्लक आहे. मुंबई इंडियन्स संघ सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना करणार आहे. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना गुजरात टायटन्स संघासोबत रंगणार आहे.

हा सामना मुंबई इंडियन्स संघाला मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. कारण मुंबईचा नेट रन रेट हा -०.१२८ असा आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा नेट रन रेट ०.१८० इतका आहे. त्यामुळे मुंबईला हा सामना जिंकून, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या पराभवाची वाट पाहावी लागणार आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचे १४ सामने झाले असले. तरीदेखील राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएल २०२३ स्पर्धेत अजूनही टिकून आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव झाल्यास, राजस्थान रॉयल्स संघाला आत जाण्याची संधी असणार आहे. (Latest sports updates)

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटक अखेर ८ गडी बाद १७६ धावा केल्या होत्या. या संघाकडून निकोलस पुरनने आक्रमक खेळी करत ३० चेंडू चेंडूंचा सामना करत ५८ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. तर क्विंटन डी कॉकने २ षटकारांच्या साहाय्याने २८ आणि प्रेरक मांकडने २० चेंडूंचा सामना करत २६ धावांची खेळी केली.

रिंकूची खेळी व्यर्थ..

कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून जेसन रॉयने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली.

या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला. तर वेंकटेश अय्यरने २४ धावांची खेळी केली. शेवटी रिंकू सिंगने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत नाबाद ६७ धावांची खेळी केली. मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघ विजयापासून १ धाव दूर राहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election: नगरमध्ये महाविकास आघाडीत फूट! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा सुजय विखेंना पाठिंबा; निलेश लंकेंना बालेकिल्ल्यात धक्का

Maharashtra Weather Forecast: पुणे, ठाणे आणि रायगडसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीची शक्यता

Delhi School Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी प्रकरण, दिल्ली सरकारने शिक्षकांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक; १ ठार २ जखमी, वाशिममधील घटना

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

SCROLL FOR NEXT