

आधार पॅन लिंक करणे अनिवार्य
३१ डिसेंबरपरपर्यंत करा हे काम
अन्यथा पॅन कार्ड होणार बंद
प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. आता आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. आधार पॅन कार्ड लिंक करण्यासाठी शेवटचे ७ दिवस उरले आहे. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे.
जर तुम्ही आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुमचे कार्ड १ जानेवारी २०२५ पासून बंद होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही लिंक केले नसेल तर लवकरात लवकर करावेत.
ज्या लोकांचे आधा कार्ड १ ऑक्टोबर २०२४ आधी जारी केले आहेत. त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत आधार पॅन लिंक करायचे आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुमची टॅक्स आणि बँकेसंबंधित अनेक कामे होणार नाहीत.
आधार पॅन लिंक करणे का गरजेचे?
आधा आणि पॅन कार्ड लिंक न झाल्याने तुम्हाला अनेक आर्थिक अडचणी येऊ शकतात. टॅक्स करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. यामुळे बँकेची, म्युच्युअल फंड, शेअर, बॉन्ड, इन्श्युरन्स अशी अनेक कामे होणार नाहीत.
डेडलाइनआधी काम न केल्यास भरावा लागणार दंड
जर तुम्ही आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला पॅन कार्ड पुन्हा सुरु करण्यासाठी १००० रुपयांचा दंड भरावा लागेल. हा दंड Income Tax e-Pay Tax द्वारे करावे लागणार आहे. यानंतर आधार पॅन कार्ड लिंक होणार आहे.
आधार पॅन लिंक करण्याची प्रोसेस (Aadhaar-Pan Link Online Process)
सर्वात आधी तुम्हाला Income Tax e-Filing Portal वर जायचे आहे. यानंतर Link Aadhaar ऑप्शन निवडायचा आहे.
यानंतर तुम्हाला पॅन आणि आधार नंबर टाकायचा आहे.
यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल. तो टाकून वेरिफाय करा.
यानंतर तुम्ही लिंक करु शकतात. याचसोबत १००० रुपये भरावे लागणार आहे. यानंतर तुमचे आधार आणि पॅन लिंक होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.