Pan Card: हे काम लगेच करा, अन्यथा बंद होणार पॅन कार्ड; सरकारने दिली डेडलाइन

Aadhaar- Pan Card Link Rules: आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. दरम्यान, यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जर तुम्ही आधार-पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद केले जाईल.
Pan Card
Pan CardSaam Tv
Published On
Summary

पॅन कार्डबाबत महत्त्वाची अपडेट

आधार-पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य

आधार पॅन लिंक न केल्यास पॅन कार्ड होणार बंद

पॅन कार्ड हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. बँक अकाउंट उघडण्यापासून ते आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन कार्ड लागते. तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल,पैशासंबंधित प्रत्येक व्यव्हारांसाठी पॅन कार्ड गरजेचे आहे. दरम्यान, आता पॅन कार्डबाबत निर्णय घेण्यात आला आहे. जर तुम्ही आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

Pan Card
Aadhaar Linking Voter ID : आधार कार्ड-मतदान ओळखपत्र लिंकसंदर्भात मोठी अपडेट, लगेच चेक करा !

आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. तुम्हाला ३१ डिसेंबर २०२५ आधी आधार आणि पॅन कार्ड लिंक करायचे आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद होऊ शकते. यामुळे तुम्हाला भविष्यात खूप अडचणी येऊ शकतात.

पॅन कार्डशिवाय तुमचे बँकेचे कोणतेही काम होत नाही. अकाउंट उघडण्यापासून ते एफडी तयार करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही सर्वात आधी आधार आणि पॅन कार्ड लिंक करुन घ्या.

Pan Card
Aadhaar Card Rules Change: आधार कार्डबाबत मोठी अपडेट; कार्ड बनवण्यापासून ते अपडेटपर्यंतच्या नियमांमध्ये अनेक बदल

आधार-पॅन कार्ड लिंक कसं करायचं? (How to Link Aadhaar with Pan Card Online)

  1. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने ५ मिनिटात आधार पॅन कार्ड लिंक करु शकतात.

  2. सर्वात आधी तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

  3. तिथे तुम्हाला Link Aadhaar असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

  4. यानंतर तुमच्यासमोर एक लिंक ओपन होईल. तिथे तुम्हाला पॅन, आधार कार्ड नंबर टाकायचे आहे. त्यानंतर तुमचे नाव टाकायचे आहे.

  5. यानंतर तुमच्या आधारशी लिंक मोबाईल नंबरवर ओटीरी येईल तो टाकावा.

  6. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला १००० रुपये भरावे लागणार आहे. पेमेंट झाल्यावर तुम्हाला मेसेज येईल.

  7. यानंतर तुमची आधार आणि पॅन लिंकची प्रोसेस सुरु होईल. तुम्हाला एक acknowledgement number मिळेल. या नंबरवरुन तुम्ही आधार पॅन लिंकचा स्टेट्‍स चेक करु शकतात.

Pan Card
Aadhaar Card: Aadhaar–PAN शोधत बसू नका, फक्त हे एक App करा डाऊनलोड, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com