Aadhaar Card: Aadhaar–PAN शोधत बसू नका, फक्त हे एक App करा डाऊनलोड, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Digi Locker: डिजिलॉकर अॅपद्वारे आपण आधार, पॅन, लायसन्ससह महत्त्वाची सरकारी कागदपत्रे मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवू शकता. इमर्जन्सीमध्ये ही डिजिटल डॉक्युमेंट्स फिजिकल कॉपीइतकीच कायदेशीर मान्यता मिळवतात.
Aadhaar save online
DigiLocker saam tv
Published On

DigiLocker हा सरकारी डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. याच्या मदतीने नागरिकांना त्यांचे अधिकृत कागदपत्रे ऑनलाइन सुरक्षित ठेवता येतात. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MeitY) डिजिटल इंडिया मिशनअंतर्गत ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता आधार, पॅन कार्ड किंवा इतर महत्त्वाची कागदपत्रे नेहमी सोबत बाळगण्याची गरज राहत नाही. या अॅपमध्ये सेव केलेले डिजिटल डॉक्युमेंट्स फिजिकल कॉपीइतकेच कायदेशीर मानले जातात. इंडियन रेल्वे, ट्रॅफिक पोलीस यांसारखे विभागही DigiLocker मधील डॉक्युमेंट्स स्वीकारतात.

DigiLocker वापरणे खूप सोपे आहे. Android किंवा iOS स्मार्टफोनमध्ये हे अॅप डाउनलोड केल्यानंतर भाषा निवडा आणि लॉगिन करा. नवीन युजर्स आधारला लिंक असलेल्या मोबाइल नंबर नोंदवा. OTP मिळाल्यावर Aadhaar नंबर टाकून तो DigiLocker शी लिंक करा. त्यानंतर 6 अंकी सिक्युरिटी PIN सेट करा.

Aadhaar save online
Margashirsha Amavasya 2025: मार्गशीर्ष अमावस्येला शिवलिंगावर अर्पण करा 'या' ५ वस्तू; कष्ट आणि पैशाची तंगी होईल दूर

अॅपमध्ये Issued Documents या सेक्शनमध्ये जाऊन संबंधित सरकारी विभाग निवडावा. उदाहरणार्थ, Aadhaar साठी UIDAI आणि PAN साठी इनकम टॅक्स डिपार्टमेंट. त्यानंतर Aadhaar नंबर, PAN नंबर किंवा जन्मतारीख भरल्यावर DigiLocker तुमचे डॉक्युमेंट सरकारी डेटाबेसमधून Fetch करून देतो. ते आपोआप Issued Documents मध्ये सेव्ह होते.याच पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स, बर्थ सर्टिफिकेट किंवा इतर सरकारी प्रमाणपत्रेही अॅपमध्ये आणता येतात. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी ‘सड़क परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय’ (MoRTH) निवडून लायसन्स नंबर टाकावा लागतो. काही क्षणातच लायसन्स अॅपमध्ये Fetch होते.

जर तुम्हाला स्वतःचे इतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील तर Drive सेक्शनमध्ये जाऊन ‘+’ आयकॉनवर टॅप करा आणि फोनमधील फाइल निवडून सेव करा. अपलोड केलेले दस्तऐवजही सुरक्षित राहतात. मात्र, DigiLocker PIN आणि लॉगिन डिटेल्स सिक्रेट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Aadhaar save online
Supplement Warning: 'या' 5 सप्लिमेंट्स खाताय? मग वेळीच सावध व्हा! वाढेल हार्ट अटॅक अन् लिव्हर फेल्युअरचा धोका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com