Mohammed Siraj DSP Salary saam tv
क्रीडा

Mohammed Siraj DSP Salary: डीएसपी मोहम्मद सिराजला किती मिळणार पगार? पाहा किती असेल भारतीय गोलंदाजाचं इनकम

Mohammed Siraj DSP Salary: नुकतंच सिराजला तेलंगणा पोलिसात पोलीस उपाधिक्षकाची नोकरी मिळाली आहे. दरम्यान यावेळी सिराजला पगार किती मिळणार आहे, त्याची माहिती घेऊया.

Surabhi Jagdish

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या सिरीजपूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. भारत सरकार खेळ कोट्यातून काही खेळाडूंना सरकारी नोकरीची संधी मिळते. त्याचप्रमाणे सिराजला तेलंगणा पोलिसात पोलीस उपाधिक्षकाची नोकरी मिळाली आहे.

सिराजने उपअधीक्षकपदाची सूत्रं स्विकारली

शुक्रवारी मोहम्मद सिराज यानं तेलंगणा पोलीस महासंचालकांना रिपोर्ट केल्यानंतर पोलीस उपअधीक्षकपदाचा भार स्विकारला. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर्षी जुलैमध्ये तेलंगणा सरकारने सिराजसह बॉक्सिंगपटू निकहत जरीनचंही चांगल्या कामगिरीनंतर कौतुक केलं होतं. तसंच ग्रुप १ मध्ये नोकरी देण्याची घोषणा केली होती.

त्यामुळे आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडे महत्त्वाची जबाबदारी आली आहे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर सिराजसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. तेलंगणा सरकारने जमिनीसह सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. दरम्यान यावेळी सिराजला पगार किती मिळणार आहे, त्याची माहिती घेऊया.

डीएसपी म्हणून सिराजला किती मिळणार पगार?

मिळालेल्या माहितीनुसार, सिराजला पगार म्हणून खूप मोठी रक्कम मिळणार आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील एका बातमीनुसार, तेलंगणा पोलिसांमध्ये डीएसपीची वेतनश्रेणी ५८,८५० रुपये ते १,३७,०५० रुपये आहे. त्याचप्रमाणे पगारासोबत सिराजला घरभाडं भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि प्रवास भत्ता असे इतर भत्ते मिळणार आहे.

बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात चमकला सिराज

नुकतंच भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये टेस्ट सिरीज खेळवण्यात आली. या टेस्ट सिरीजमध्ये मोहम्मद सिराजने चांगली कामगिरी केली होती. सिराजनं बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट मालिकेतही उत्कृष्ट कामगिरी केली होती. या मालिकेत सिरीजमध्ये त्याने ४ विकेट घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे भारतानं ही मालिका २-० ने जिंकली.

मोहम्मद सिराज आता न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये खेळताना दिसणार आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या पहिला टेस्ट सामना १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सिरीजनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT