Barabati stadium pitch report SAAM TV
Sports

IND vs SA: कसं आहे बाराबाती स्टेडियमचं पिच? सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने केला मोठा खुलासा

Barabati stadium pitch report: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना आज कटकच्या बाराबाती स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. आगामी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिला टी-20 सामना 9 डिसेंबर रोजी कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या दृष्टीने ही सिरीज भारतीय टीमसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या पाच सामन्यांनंतर भारताला न्यूझीलंडविरुद्धही पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे टीम इंडिया या सिरीजद्वारे वर्ल्ड कपसाठीची तयारी करणार आहे.

पीच बद्दल काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने बाराबती स्टेडियमच्या पिचबाबत मोठा खुलासा केला. सूर्या म्हणाला, "या ठिकाणचं पिच लाल मातीचं बनलंय. मी पहिल्यांदाच असं पिच पाहतोय. मला अजून पिचजवळ जाण्याची संधी मिळालेली नाही. पण मला वाटतं की, ते चांगलं असेल. काळी माती अधिक चांगली असते, पण लाल मातीच्या पिचवरही चांगला खेळ होईल असं वाटतंय. जर पिच वेगवान असेल तर ते आमच्यासाठी फायदेशीर ठरेल."

कटकमध्ये भारताचे टी-20 रेकॉर्ड

कटकमध्ये आतापर्यंत हाय-स्कोरिंग सामने फारसे झालेले नाहीत. या मैदानावर एकूण 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. शेवटचा सामना जून 2022 मध्ये झाला होता. भारताने या ठिकाणी खेळलेल्या 3 सामन्यांपैकी फक्त 1 सामन्यात विजय मिळवला होता तर 2 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

या पिचवर स्पिनर्सपेक्षा वेगवान गोलंदाजांचा प्रभाव अधिक दिसतो. संध्याकाळी दव पडल्यामुळे फलंदाजी सोपी होते आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या टीमला फायदा मिळतो.

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा दबदबा

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आतापर्यंत एकूण 30 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 18 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने 12 सामने जिंकले आहेत. आता या सिरीजमध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. याआधी खेळलेल्या वनडे सिरीजमध्ये भारताने 2-1 असा विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT