Rohit Sharma weight loss saam tv
Sports

Rohit Sharma Fitness: रोहित शर्माने कसं कमी केलं १० किलो वजन? तब्बल 252 तास हिटमॅनने घेतली इतकी मेहनत

Rohit Sharma weight loss: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि 'हिटमॅन' रोहित शर्मा नेहमीच त्याच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो त्याच्या अविश्वसनीय 'बॉडी ट्रान्सफॉर्मेशन'मुळे चर्चेत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पर्थ वनडेमध्ये खेळताना रोहित शर्मा कडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. खासकरून त्याने वजन कमी केल्यामुळे चाहत्यांची अपेक्षा अधिक होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहितने फिटनेस अगदी मानवर घेतला होता. रोहित 10 किलो वजन कमी करून ऑस्ट्रेलियात पोहोचलाय. इतकंच नाही तर मैदानात तो आधीपेक्षा अधिक फिट दिसत होता. ही बदललेली फिटनेस त्याच्या 252 तासांच्या कष्टाचं फळ आहे.

रोहितचा फीटनेस पाहून अनेकांच्या मनात प्रश्न आहे की रोहितने असा कमाल बदल कसा घडवून आणला? त्याने नेमकं काय केलं? याचे उत्तर त्याने नाही तर त्यांना ट्रेन करणाऱ्या आणि त्याचा जवळचा मित्र असलेल्या अभिषेक नायरने दिलंय.

रोहितचे वजन किती कमी झालं?

रोहित शर्मा वजन कमी करत असल्याच्या चर्चा आधीपासून होत्या. यावेळी त्याचे फोटो पाहूनही हे जाणवत होते. मात्र नेमकं किती वजन कमी झालं याची अधिकृत माहिती नव्हती. ही माहिती स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात अभिषेक नायरने दिली. नायरने सांगितलं की, रोहितने एकूण 10 किलो वजन कमी केलं आहे. केवळ फिटनेसच नव्हे तर रोहितने ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी फलंदाजीचीही तयारी अभिषेक नायरसोबतच केली होती.

12 आठवड्यांची मेहनत महत्वाची

अभिषेक नायर यांच्या मते रोहितने तीन महिन्यांत, म्हणजे एकूण 12 आठवड्यांत, 10 किलो वजन कमी केलं. या काळात त्याने व्यवस्थित आखलेल्या ट्रेनिंग प्लॅननुसार काम केलं. या प्लॅनमध्ये सर्वात जास्त लक्ष हार्डकोर ट्रेनिंगवर होतं. यात सुरुवातीचे काही आठवडे बॉडी बिल्डिंग प्रकारच्या ट्रेनिंगवर गेले, ज्यामध्ये शरीराची बनावट आणि स्नायू मजबूत करण्यावर काम झालं.

त्यानंतरच्या आठवड्यांत त्याने आपल्या कौशल्यांवर आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. या संपूर्ण काळात त्याने स्वतःला पूर्णपणे शिस्तीत ठेवलं. रोहितने तब्बल तीन महिने दररोज तीन तास प्रशिक्षण घेतलं. म्हणजे आठवड्याला 21 तास आणि 12 आठवड्यांमध्ये एकूण 252 तास परिश्रम केले.

या प्रशिक्षणात केवळ रनिंग किंवा जिमच नव्हतं तर योग्य आहार, स्ट्रेंथ ट्रेनिंग, रिकव्हरी आणि मानसिक तयारी यांनाही तितकंच महत्त्व दिलं गेलं. हाच तो काळ होता ज्यात रोहितने आपल्या फिटनेसला सर्वोच्च प्राधान्य दिलं आणि स्वतःला पुन्हा मैदानात प्रभावी कामगिरीसाठी तयार केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BSNL चा धमाका! अनलिमिटेड कॉलिंग अन् १०० जीबी डेटा; विद्यार्थांसाठी आणला नवा प्लॅन

Shocking : क्षणात सर्व काही संपलं! सौदी अरेबियातील भीषण अपघात एकाच कुटुंबातील १८ लोकांचा मृत्यू

Income Tax Refund: करदात्यांसाठी बातमी, कर परतावा कधी मिळणार, आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics: चंद्रपुरात भाजपसोबत मोठा गेम,४ नगरपरिषदांमध्ये पक्षात्तर करत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधातच बंडखोरी

Supreme Court :...तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करू; निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT