IND vs AUS: काय ही फालतूगिरी? वारंवार पावसाचा व्यत्यय, फक्त ३२-३२ ओव्हर्सचा सामना, काय आहे नियम?

Reduced overs target calculation: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट सामना नेहमीच महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान या सामन्यात सततच्या पावसाने चाहत्यांचा हिरमोड केलाय. अशातच क्षणभर पावसाने ओव्हरमध्ये कपात केली आहे.
Reduced overs target calculation
Reduced overs target calculationsaam tv
Published On

पर्थमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला वनडे सुरू झाला आहे. मात्र पावसामुळे खेळात सतत अडथळे येताना दिसतोय. सामना सुरू होण्यापूर्वी आणि 12 ओव्हर पूर्ण होण्याआधीच दोन वेळा खेळ थांबवावा लागला. मात्र यानंतर ओव्हर्समध्ये कपात करण्यात आली. पहिल्या वेळी पाऊस सुमारे 10 मिनिटांसाठी पडला आणि खेळ थांबला. मात्र यावेळी 1 ओव्हर कमी करावी लागली. परंतु याचं कारण अनेकांना समजलं नाही.

1 ओव्हर कपातीमागे कारण

भारताच्या वेळेनुसार सकाळी 9:43 वाजता पाऊस पडल्यामुळे सामना थांबवावा लागला. त्यावेळी भारताचा स्कोर 8.5 ओव्हरमध्ये 25/3 होता. रोहित शर्मा (8), विराट कोहली (0) आणि शुभमन गिल (10) या टॉप-3 फलंदाजांचे विकेट टीम इंडियाने गमावले होते.

जवळपास 7 मिनिटांनी कव्हर्स काढले गेले आणि सामना पुन्हा सुरू झाला. त्यावेळी ओव्हर्समध्ये एका ओव्हरची कपात करण्यात आली होती. याचं कारण पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यांसाठी अतिरिक्त वेळ (एक्स्ट्रा टाइम) ठरवलेला नव्हता.

Reduced overs target calculation
यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

पर्थमध्ये होणाऱ्या पहिल्या वनडेसाठी अतिरिक्त वेळ राखीव ठेवलेला नाही. त्यामुळे सामना रात्री ८ वाजेपर्यंत संपणार आहे. अशातच दुसऱ्या वेळी जेव्हा पाऊस, आला तेव्हाही सामना थांबला. या वेळी थोडा जास्त वेळ सामना थांबला आणि पुन्हा खेळ सुरू झाल्यावर ३५-३५ ओव्हर्स खेळवण्याचं निश्चित करण्यात आलं. मात्र, यापैकी ५ ओव्हर्सचा खेळही होऊ शकला नाही आणि पुन्हा पाऊस आला. सततच्या पावसामुळे सध्या ३२ ओव्हर्सचा सामना खेळवण्यात येतोय.

Reduced overs target calculation
IND VS AUS: रोहित-विराटचा फुसका बार, गिलही फ्लॉप; भारताची वाईट सुरूवात

भारताची प्लेइंग इलेवन

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह.

Reduced overs target calculation
IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेवन

ट्रेविस हेड, मिच मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कोनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नाथन एलिस, मॅथ्यू कुहनेमॅन आणि जोश हेझलवुड.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com