आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरु आहे. टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या स्पर्धेचा थरार यावेळी अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये संयुक्तरित्या पार पडणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची धुरा रोहित शर्माकडे असणार आहे. तर हार्दिक पंड्याकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हॉटस्टारने रोहित शर्माचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे.
रोहित शर्मा हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या अनुभवाचा अंदाज तुम्हाला यावरुनच येईल की, त्याने २००७ पासून ते २०२२ पर्यंत झालेले सर्व टी-२० वर्ल्डकप खेळले आहेत. हा रेकॉर्ड केवळ शाकिब अल हसन आणि रोहित शर्मालाच करता आला आहे.
हॉटस्टारने शेअर केलेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,रोहित शर्माचा २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. रोहितने आपला पहिला टी-२० वर्ल्डकप २००७ मध्ये खेळला होता. आतापर्यंत या स्पर्धेचे ९ हंगाम खेळले गेले आहेत. या सर्व हंगामांमध्ये रोहित शर्माने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यादरम्याच २००७ मध्ये भारतीय संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं.
या सामन्यातही रोहितने महत्वपूर्ण खेळी केली होती. २०२२ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत तो कर्णधार म्हणून मैदानात उतरला होता. या स्पर्धेत भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळीही रोहित शर्मा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा टी-२० वर्ल्डकप असू शकतो. त्यामुळे भारतीय संघ आणखी जोर लावताना दिसून येऊ शकतो.
रोहित शर्माच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १५१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३१.८ च्या सरासरीने ३९७४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतकं झळकावली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.