Rohit Sharma Viral Video: धो धो पावसामुळे हिटमॅन आणि द वॉलची उडाली तारांबळ, भिजण्यापासून वाचण्यासाठी केलं असं काही...

Rohit Sharma- Rahul Dravid Viral Video: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Rohit Sharma Viral Video: धो धो पावसामुळे हिटमॅन आणि द वॉलची उडाली तारांबळ, भिजण्यापासून वाचण्यासाठी केलं असं काही...
rohit sharma rahul dravid run in rain twitter
Published On

भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी अमेरिकेत दाखल झाला आहे. सध्या भारतीय संघातील खेळाडू न्यूयॉर्कमध्ये सराव करण्यात व्यस्त आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ १ जून रोजी बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि हेड कोच रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघेही बाहेर हॉटेलमध्ये गेले होते. नेमका त्याचवेळी पाऊस आला आणि दोघांची पळता भूई थोडी झाली. पाऊस आला त्यावेळी दोघेही पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. मात्र पाऊस काही थांबला नाही. त्यामुळे दोघांनीही धावत कारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आधी रोहित धावत कारमध्ये गेला. त्यानंतर राहुल द्रविड धावत कारमध्ये गेले. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Rohit Sharma Viral Video: धो धो पावसामुळे हिटमॅन आणि द वॉलची उडाली तारांबळ, भिजण्यापासून वाचण्यासाठी केलं असं काही...
Team India Head Coach: एमएस धोनी टीम इंडियाचा हेड कोच बनू शकत नाही,अर्जही फेटाळला जाईल; वाचा कारण

बीसीसीआयने ३० एप्रिल रोजी भारतीय संघाची घोषणा केली होती. या संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. तर उपकर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. या संघात अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंना देखील स्थान दिलं गेलं आहे. रोहित शर्मासह यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव हे फलंदाज खेळताना दिसून येतील.

Rohit Sharma Viral Video: धो धो पावसामुळे हिटमॅन आणि द वॉलची उडाली तारांबळ, भिजण्यापासून वाचण्यासाठी केलं असं काही...
IPL 2024 Final: सारखा स्कोर सारखं चेज! IPLच्या दोन फायनल स्क्रिप्टेड की योगायोग?

या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा यांना स्थान देण्यात आलं आहे. तर गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com