Rohit Sharma Statement: 'कॅप्टन म्हणून हेच मोठं आव्हान..',रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

Rohit Sharma On Captaincy: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्माने नेतृत्वाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Rohit Sharma Statement: 'कॅप्टन म्हणून हेच मोठं आव्हान..',रोहित शर्माचं मोठं वक्तव्य
rohit sharma statementsaam tv

भारतीय संघ मिशन टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी अमेरिकेत दाखल झाला आहे. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाने सराव देखील सुरु केला आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वी रोहित शर्माने नेतृत्व करताना कोणती आव्हानं येतात याबाबत भाष्य केलं आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

नेतृत्वात येणाऱ्या आव्हानाबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ' वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना हाताळणं हे कर्णधारासमोर असलेलं सर्वात मोठं आव्हान आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला महत्व देणं ही माझ्या नेतृत्वातील सर्वात मोठी शिकवण आहे. कारण प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की, आपण या संघाचा भाग आहोत.' रोहित शर्मा आणि खेळांडूमधला युवा खेळाडूंमधला ताळमेळ उत्तम आहे. कारण त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या खेळाडूने नेहमीच त्याचं कौतुक केलं आहे.

नुकताच रिंकू सिंगने त्याचं कौतुक केलं होतं. तो म्हणाला होता की, ' रोहित शर्माला युवा खेळाडूंना खूप सपोर्ट करतो. तो एक उत्कृष्ठ कर्णधार आहे, हे साऱ्या जगाला माहित आहे. त्याला नेहमी हेच वाटतं की, युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी करावी.'

Rohit Sharma Statement: 'कॅप्टन म्हणून हेच मोठं आव्हान..',रोहित शर्माचं मोठं वक्तव्य
IPL 2024 Playing XI: IPL 2024 स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग 11! तुम्हाला काय वाटतं?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र या स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता रोहित शर्मा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आर्यंलडविरुद्ध होणार आहे. तर भारत- पाकिस्तान सामना ९ रोजी रंगणार आहे.

Rohit Sharma Statement: 'कॅप्टन म्हणून हेच मोठं आव्हान..',रोहित शर्माचं मोठं वक्तव्य
Rinku Singh Statement: '१०- १५ रुपयांसाठी तरसायचो, आता ५५ लाख..', IPL च्या मानधनाबाबत रिंकू सिंगचं मोठं वक्तव्य

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com