Zimbabwe defeated australia in t20 world cup SAAM TV
Sports

Australia vs Zimbabwe: टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात उलटफेर; झिम्बाब्वे संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारली

Zimbabwe defeated australia in t20 world cup: टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. झिम्बाब्वे संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास घडवला. सामन्याचा संपूर्ण आढावा आणि महत्त्वाचे क्षण जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. झिम्बाब्वेने बलाढ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. तब्बल २३ रन्सने झिम्बाब्वेसारख्या टीमकडून वर्ल्डकपच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना कराला लागलाय.

आयसीसी टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या १९ व्या सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा २३ रन्सने पराभव केला. या विजयासह झिम्बाब्वे टीमने या स्पर्धेत आपला दुसरा विजय नोंदवला. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने टॉस जिंकला आणि मजबूत फलंदाजी लक्षात घेऊन त्यांनी रन्स चेज करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पूर्णपणे फेल गेला.

झिम्बाब्वेच्या टीमने ऑस्ट्रेलियासमोर १७० रन्सचं आव्हान ठेवलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाची टीम 146 रन्सवर गारद झाली. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाची मॅट रेनशॉ आणि ग्लेन मॅक्सवेल ही जोडी मैदानावर आली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाने २९ रन्सवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. यामध्ये ऑस्ट्रेलियन टीमकडून मॅट रेनशॉने सर्वाधिक ६५ रन्सची खेळी केली.

झिम्बाब्वेच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर एक पकड बनवली होती. गोलंदाजी करताना झिम्बाब्वेने फक्त ३८ रन्स दिले. ग्लेन मॅक्सवेल (३१) आणि मॅट रेनशॉ (६५) यांच्यातील पाचव्या विकेटसाठी ७७ रन्सच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला कमबॅक करण्यास मदत झाली. मात्र कांगारूंच्या विकेट्स पडत होत्या. १८ व्या ओव्हरमध्ये Munyonga ने घेतलेल्या अप्रितम कॅचमुळे संपूर्ण सामन्याचं चित्रचं पालटलं.

झिम्बाब्वेने डावाची सुरुवात चांगली केली होती. ब्रायन बेनेट (६४) आणि तादिवानाशे मुरुमानी (३५) या ओपनिंग जोडीने पॉवर प्लेमध्ये ४७ रन्स केले. आठव्या षटकात मुरुमानीच्या विकेटमुळे ही पार्टनरशिप मोडली. झिम्बाब्वेच्या मिडल ऑर्डरने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध चांगली खेळी केली.

टी-२० वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेकडून ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्यांदा पराभव

झिम्बाब्वेने २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. त्यावेळी 5 विकेट्सने ऑस्ट्रेलियाा पराभव केला होता. तर यंदा २३ रन्सने झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT