IND VS PAK: पाकिस्तानला झोडून काढणाऱ्या हार्दिक-इशानचा नवा विक्रम; १८ वर्षांत टीम इंडियातील कुणालाच जमलं नव्हतं!

IND vs PAK Asia Cup 2023: ईशान किशान आणि हार्दिक पंड्याने जबरदस्त खेळी करत शतकीय भागिदारी रचली. तसेच तुफान फलंदाजी करत दोघांनी नवा विक्रम रचला आहे.
IND VS PAK: पाकिस्तानला झोडून काढणाऱ्या हार्दिक-इशानचा नवा विक्रम; १८ वर्षांत टीम इंडियातील कुणालाच जमलं नव्हतं!
Published On

IND vs PAK Asia Cup 2023:

टीम इंडियाचा उप-कर्णधार हार्दिक पंड्याने पाकिस्तानच्या विरोधात जबरदस्त खेळी खेळली. हार्दिकच्या खेळीवर क्रिकेट चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या हायव्होल्टेज सामन्यात ईशान किशान आणि हार्दिक पंड्याने जबरदस्त खेळी करत शतकीय भागिदारी रचली. तसेच तुफान फलंदाजी करत दोघांनी नवा विक्रम रचला आहे. (Latest Marathi News)

पाकिस्तानविरुद्ध असलेल्या सामन्यात हार्दिक पंड्याने पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलंच धुतलं. हार्दिक पंड्याने ९० चेंडूत एक षटकार आणि ७ चौकार लगावत ८७ धावा कुटल्या. पंड्याने पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त खेळी खेळली.

हार्दिक पंड्याने पाकिस्तानविरुद्ध दुसरं अर्धशतक ठोकलं. या सामन्यात हार्दिक पंड्याला ईशान किशानची चांगली साथ मिळाली. दोघांनी मिळून राहुल द्रविड आणि युवराज सिंहचा विक्रम मोडला. ईशानने सामन्यात ८२ धावा कुटल्या.

हायव्होल्टेज सामन्यात हार्दिक पंड्या आणि ईशान किशानसोबत पाचव्या विकेटसाठी १३८ धावांची भागिदारी रचली. आशिया कपच्या इतिहासात हार्दिक आणि ईशानने विक्रमी भागिदारी रचली.

IND VS PAK: पाकिस्तानला झोडून काढणाऱ्या हार्दिक-इशानचा नवा विक्रम; १८ वर्षांत टीम इंडियातील कुणालाच जमलं नव्हतं!
IND vs PAK Asia Cup 2023: ईशान किशन-हार्दिक पंड्यानं सावरलं, नंतर बुमराहने ठोकून काढलं; टीम इंडियाचं पाकिस्तानला २६७ धावांचं लक्ष्य

या आधी पाचव्या विकेटसाठी मोठी भागिदारी रचण्याचा विक्रम राहुल द्रविड आणि युवराज सिंह यांच्या नावावर होता. आता ईशान किशान आणि हार्दिक पंड्याने या दोघांचा विक्रम मोडीत काढला आहे. या दोघांनी आता नवा विक्रम रचला आहे.

टीम इंडियाचं पाकिस्तानसमोर २६७ धावांचं लक्ष्य

आशिया कप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना सुरू आहे. या सामन्यांकडे बहुतांश भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ईशान किशन आणि हार्दिक पंड्याने चांगली डाव सावरला. टीम इंडियाने पाकिस्तानला २६७ धावांचं लक्ष्य दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com