team india saam tv
Sports

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात घातक गोलंदाजाची एन्ट्री, बुमराहला संघाबाहेर ठेवण्याचं कारण आलं समोर

Harshit Rana Team India : चॅम्पयन्स ट्रॉफीच्या संघात भारतीय संघाने दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणाचा समावेश केला आहे. त्याशिवाय यशस्वी जायस्वाल यालाही बाहेरचा रस्ता दाखवला.

Namdeo Kumbhar

Harshit Rana Team India : १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार सुरू होणार आहे. त्याआधी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आलाय. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह याला संघातून वगळण्यात आलेय. बुमराहच्या जागी युवा हर्षित राणा याचा समावेश करण्यात आलाय. आतापर्यंत हर्षित राणा यानं आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलेय, त्यामुळे त्याची निवड झाली आहे. बुमराहशिवाय सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल याचाही पत्ता कट झालाय. यशस्वी जायस्वालच्या जागी फिरकी गोलंदाज वरूण चक्रवर्ती याला संघात स्थान देण्यात आलेय.

बुमराह संघाबाहेर का?

जसप्रीत बुमराह गेल्या काही दिवसांपासून दुखापतग्रस्त होता. अद्याप तो पूर्णपणे तंदुरूस्त झाला नाही. बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान अखेरच्या कसोटीवेळी बुमराह दुखापतग्रस्त झाला होता, त्यामधून तो अद्याप सावरलेला नाही. त्यामुळेच त्याला संघाबाहेर ठेवण्यात आलेय. बीसीसीआयकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

हर्षित राणाला संधी का देण्यात आली ?

गेल्या काही दिवसांपासून हर्षित राणा याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलेय. वनडे, कसोटी आणि टी२० मध्ये हर्षित राणा यानं शानदार कामगिरी केली. त्याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्येही हर्षितचा रेकॉर्ड चांगलाय. त्यामुळेच त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात स्थान देण्यात आलेय. दोन वनडे सामन्यात हर्षित राणाने चार विकेट घेतल्या आहेत. एका टी२० सामन्यात तीन त्याशिवाय दोन कसोटी सामन्यात चार विकेट घेतल्या आहे. हर्षित राणा यानं आपल्या गोलंदाजीने कोच गौतम गंभीर याला प्रभावित केले. त्यामुळे हर्षित याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात स्थान देण्यात आलेय.

भारताची गोलंदाजी कशी आहे?

युवा आणि अनुभवी गोलंदाजांचे चांगले मिश्रण आहे. मोहम्मद शामी आणि रवींद्र जाडेजा यांच्याकडे तगडा अनुभव आहे. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांच्यामुळे संतुलन मिळत आहे. कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती यांच्यावर फिरकीची धुरा असेल. अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा वेगवान माऱ्याची धुरा संभाळतील. त्याशिवाय वॉशिंग्टन सुंदर अष्टपैलू खेळीने संघाला संतुलन मिळेल.

India’s squad for ICC Champions Trophy, 2025 :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर केएल राहुल, ऋषभ फंत, हार्दिक पांड्या, अक्षऱ पटेल, वॉशिंग्टन सुंगर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शामी, अर्शदीप सिंह, रवींद्र जाडेजा, वरूण चक्रवर्ती

राखीव - यशस्वी जायस्वाल, मोहम्मद सिराज, शिवम दुबे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन दिवाळीत ठाकरेसेनेला खिंडार, जेष्ठ नेत्यानं असंख्य सहकाऱ्यांसह हाती घेतलं 'कमळ'

Bangladesh: आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; धुराच्या काळोखात Airport गुडूप,धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

Pneumonia Symptoms: न्यूमोनिया कोणता आजार आहे? त्याची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT