Champions Trophy: एकाच दिवशी भारत- पाकसह हे ५ संघ उतरणार मैदानात; १ संघाला फायनल खेळण्याची संधी

ICC Champions Trophy: १२ फेब्रुवारीला भारत - पाकिस्तानसह ५ संघ खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. दरम्यान या ५ पैकी १ संघाला फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे.
Champions Trophy: एकाच दिवशी भारत- पाकसह हे ५ संघ उतरणार मैदानात; १ संघाला फायनल खेळण्याची संधी
ind vs pak
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. जगातील सर्वोत्तम ८ संघ १ ट्रॉफी जिंकण्यासाठी संघर्ष करताना दिसून येणार आहेत. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यापूर्वी ८ पैकी ५ संघ मैदानात उतरणार आहेत. १२ फेब्रुवारीला भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तिसरा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

तर २ संघ तिरंगी मालिकेतील फायनलमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान हे सामने केव्हा, कुठे आणि कधी पाहता येतील? जाणून घ्या.

Champions Trophy: एकाच दिवशी भारत- पाकसह हे ५ संघ उतरणार मैदानात; १ संघाला फायनल खेळण्याची संधी
IND vs ENG: तिसऱ्या वनडेत ३ बदल निश्चित? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

भारत- इंग्लंड खेळणार शेवटचा वनडे सामना

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील २ सामने झाले असून, दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

हा सामना जिंकून भारतीय संघ ३-० ने मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर इंग्लंडचा संघ क्लिनस्वीप होण्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Champions Trophy: एकाच दिवशी भारत- पाकसह हे ५ संघ उतरणार मैदानात; १ संघाला फायनल खेळण्याची संधी
IND vs ENG 2nd ODI: रोहितचं शतक, गिलचं अर्धशतक; भारताचा इंग्लडंवर दणदणीत विजय! २-० ने मालिकेवर कब्जा

ऑस्ट्रेलिया - श्रीलंका खेळणार पहिला वनडे सामना

ऑस्ट्रेलिया या श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार संपला असून आता दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याचा थरार १२ फेब्रुवारीला रंगणार आहे.

Champions Trophy: एकाच दिवशी भारत- पाकसह हे ५ संघ उतरणार मैदानात; १ संघाला फायनल खेळण्याची संधी
IND vs ENG: मालिका सुरु असताना संघाला मोठा धक्का! प्रमुख खेळाडू मालिकेतून बाहेर, चॅम्पियन्स ट्रॉफीलाही मुकणार

या दोन्ही संघांमध्ये रंगणार फायनल गाठण्यासाठीचा सामना

पाकिस्तान,दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या तिन्ही संघांमध्ये तिरंगी मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचाही पराभव केला. यासह न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

तर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये फायनलमध्ये जाण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना १२ फेब्रुवारीला होणार आहे. फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ १४ फेब्रुवारीला न्यूझीलंडचा सामना करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com