भारतीय महिला क्रिकेट संघात कोण जास्त शिव्या देतं?
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने दिलं होतं उत्तर
महिला क्रिकेट संघाच्या कर्णधाराचा जुना व्हिडीओ व्हायरल
Harmanpreet Kaur Viral Video : श्रीलंकेमध्ये महिला वनडे वर्ल्डकपची धामधुम सुरु आहे. या स्पर्धेमध्ये आज (९ ऑक्टोबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन महिला संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका महिला संघाची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टने टॉस जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. महिला वर्ल्डकप २०२५ मध्ये भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर चर्चेत आहे. तिचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रविवारी ५ ऑक्टोबर २०२५ रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतला सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये भारतीय महिला संघाने ८८ धावांनी पाकिस्तानच्या संघावर मात केली. या सामन्यात फलंदाजी करत असताना भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानी गोलंदाज नशरा संधू यांच्या वाद झाला.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १०० धावा पूर्ण केल्यानंतर २२ ओव्हरमध्ये नशरा संधूने गोलंदाजी करताना हरमनप्रीत कौरकडे रागाने पाहिले. हरमनप्रीतनेही संधूकडे डोळे वटारुन पाहिले. संधूला पाहत तिने काहीतरी म्हटले. हरमनप्रीत कौरने संधूला उद्देशून शिव्या दिल्याचे स्पष्ट झाले. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओनंतर तिचे मुलाखतीमधील इतर व्हिडीओही व्हायरल झाले.
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीदरम्यान तिला भारताच्या महिला क्रिकेट संघात सर्वात जास्त शिव्या कोण देतं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हरमनप्रीतने मीच देते, असे उत्तर दिले. ती म्हणाली, 'लहानपणापासून मुलासोबतच क्रिकेट खेळत आले, त्यामुळे तसाच माईड सेट बनला आहे. स्वत:ला बदलण्याचा खूप प्रयत्न केला. असा एक काळ होता, जेव्हा सीनियर्सना माझं शिव्या देणं आवडत नव्हतं. पण ते शक्य झालं नाही'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.