Mumbai Indians saam tv
Sports

Hardik Pandya: मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यामध्ये बिनसलं? काय आहे नेमकं सत्य, वाचा

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या आयपीएल २०२६ मधील पराभवानंतर हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर टीमला अनफॉलो केल्याची चर्चा रंगली. सोशल मीडियावर स्क्रीनशॉट्स व्हायरल झाल्यानंतर फॅन्समध्ये मोठी चर्चा सुरू झाली. मात्र काही मिनिटांतच मुंबई इंडियन्सचे अकाउंट पुन्हा दिसू लागले.

Surabhi Jayashree Jagdish

रविवारी आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात सामना रंगला होता. हा सामना आरसीबीने २ विकेट्स राखून जिंकला. या पराभवामुळे मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडली. मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर लगेचच कर्णधार हार्दिक पंड्याची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली. फीट नसल्यामुळे हार्दिक या सामन्यात खेळू शकला नाही.

मुंबई इंडियन्सला केलं अनफॉलो?

पराभवानंतर हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलंय. त्यावेळी, त्याच्या फॉलोअर्सच्या यादीत मुंबई इंडियन्सचं अकाउंट दिसेनासं झालं. हार्दिकचे इंस्टाग्राम फॉलोअर्स १५१ वरून १५० वर आले होते. यामुळे मुंबई इंडियन्स आणि हार्दिक यांच्यातील संबंध बिघडल्याच्या अफवा पसरल्या. याचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ही चर्चा क्षणार्धात ट्रेंड बनली.

परंतु हा बाब काळ राहिली नाही. काही मिनिटांतच हार्दिक पांड्याचे फॉलोअर्स पुन्हा १५१ झाले आणि मुंबई इंडियन्सचं अकाउंट पुन्हा दिसू लागलं. आता फॅन्स विचारत होते की, इन्स्टाग्राममध्ये खरंच काही टेक्निकल एरर होतं की हार्दिक आणि मुंबई इंडियन्समध्ये काहीतरी बिनसलं आहे?

रोहित शर्माच्या जागी झालेला कर्णधार

हार्दिक पांड्याचं मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक आणि त्याला दिलेलं कर्णधारपद यावरून त्याच्यावर बरीच टीका झाली. आयपीएल २०२४ च्या आधी जेव्हा मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी त्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं तेव्हा अनेक चाहते एक मोठा वर्ग या निर्णयावर नाराज झाला होता. तेव्हापासून टीमच्या प्रत्येक खराब कामगिरीमुळे आणि हार्दिकच्या प्रत्येक निर्णयामुळे सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू झालीये.

आयपीएल २०२६ हा सिझन मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्या या दोघांसाठीही निराशाजनक ठरला. मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र ठरू शकली नाही. तर हार्दिकची कामगिरीसुद्धा अपेक्षेपेक्षा कमी पडली. त्याने या सिझनमध्ये आतापर्यंत आठ सामने खेळून १४६ रन्स केलेत आणि चार विकेट्स घेतले आहेत.

तर पाठीच्या दुखण्यामुळे आणि फिटनेसच्या समस्यांमुळे तो तीन सामने खेळू शकला नाही. हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने टीमचं कर्णधारपद भूषवलं. सूर्या नुकताच बाबा झाला असूनही आरसीबी विरूद्धच्या सामन्यासाठी तो हजर राहिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT