Saam Tv
मोजे या रोजच्या वापरातील अशी वस्तू आहे, ज्यावर घाण लवकर दिसून येते. विशेषतः पांढरे आणि फिकट रंगाचे मोजे, काही वेळा वापरल्यानंतरच टाचांच्या आणि तळव्यांच्या बाजूने काळपट पडू लागतात.
नेहमीच्या डिटर्जंटने धुतल्यानंतरही साचलेली घाण पूर्णपणे निघत नाही. शिवाय, वारंवार घासल्याने मोज्यांचे धागे खराब होऊ शकतात.
धुण्यापूर्वी मोजे रंगानुसार वेगळे करणे महत्त्वाचे आहे. पांढरे मोजे रंगीत कपड्यांसोबत धुतल्यास त्यांच्यावर रंग लागू शकतो. त्याचप्रमाणे, खूप घाणेरडे मोजे इतर कपड्यांसोबत थेट वॉशिंग मशीनमध्ये टाकण्याऐवजी, धुण्यापूर्वी काही वेळ भिजत ठेवणे उत्तम. यामुळे घाण सैल होईल आणि धुताना ती सहजपणे निघून जाईल.
पांढऱ्या सॉक्सवरील मळ आणि डाग काढण्यासाठी गरम पाण्यात थोडा लिंबाचा रस मिसळा. यात मोजे काही वेळ भिजवून ठेवा आणि नंतर धुवा, चमक परत येईल.
पाण्यात बेकिंग सोडा मिसळून एक मिश्रण तयार करा. या मिश्रणात सॉक्स काही वेळ भिजवून ठेवा. यामुळे मोज्यांवर साचलेला मळ आणि त्यातून येणारी दुर्गंधी सहज निघून जाते.
पांढऱ्या सॉक्समधील पिवळसरपणा घालवण्यासाठी पाण्यात व्हिनेगर आणि डिटर्जंट मिक्स करा. यामध्ये मोजे भिजवून नंतर हलक्या हाताने घासून साफ करा.
मोजे धुतल्यानंतर ते नेहमी सावलीत किंवा हवेत सुकवा. मोजे खूप कडक उन्हात सुकवणे टाळा, कारण यामुळे कापड ताठ पडू शकते आणि सॉक्सची लवचिकता बिघडू शकते.