Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

Shreya Maskar

पितृपक्ष

पितृपक्षात श्राद्धाच्या प्रसादासाठी आवर्जून तांदळाची खीर बनवली जाते. तांदूळ आणि दूध यापासून तयार होणारी खीर ही पारंपरिक भारतीय गोड पदार्थांपैकी एक आहे.

Pitru Paksha | pinterest

तांदळाची खीर

तांदळाची खीर बनवण्यासाठी तांदूळ, दूध, साखर, वेलची पूड , काजू-बदाम, मनुका आणि केशर इत्यादी साहित्य लागते.

Rice Kheer | pinterest

तांदूळ स्वच्छ धुवा

तांदळाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन 15-20 मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर पाणी काढून तांदूळ थोडा निथळू द्या.

Wash the Rice | pinterest

गरम दूध

मोठ्या पातेल्यात दूध घेऊन मध्यम आचेवर उकळायला ठेवा. दूध तळाला लागू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहा. दूध उकळल्यानंतर त्यात भिजवलेला तांदूळ घाला. आच मंद करा आणि तांदूळ पूर्णपणे शिजेपर्यंत खीर ढवळत राहा.

Hot Milk | pinterest

साखर

तांदूळ मऊ झाल्यानंतर साखर घाला. साखर विरघळेपर्यंत चांगले ढवळा आणि आणखी काही मिनिटे मंद आचेवर शिजवा.

Sugar | pinterest

वेलची- सुकामेवा

शेवटी वेलची पूड आणि आपल्या परंपरेनुसार काजू-बदाम, मनुका किंवा केशर घाला. दोन-तीन मिनिटे शिजवल्यानंतर गॅस बंद करा.

Cardamom and Dry Fruits | pinterest

टीप १

खीर मंद आचेवर शिजवल्यास दूध घट्ट होते आणि चव अधिक छान येते.जाड बुडाचे पातेले वापरल्यास दूध तळाला लागण्याची शक्यता कमी होते.

Tip 1 | pinterest

टीप २

खीर गॅसवरून उतरवल्यानंतरही घट्ट होत जाते, त्यामुळे सुरुवातीला ती खूप घट्ट करू नका.

Tip 2 | pinterest

NEXT : पितरांसाठी बनवा खीर-पुरीचा नैवेद्य, स्वादिष्ट प्रसादाची सोपी रेसिपी

Pitru Paksha | AI PHOTO
येथे क्लिक करा...