hardik pandya with shubman gill  yandex
Sports

Team India Captain: शुभमन गिलने हार्दिक पंड्याचं टेन्शन वाढवलं!कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार?

Team India T20I Captain: रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान कोण होणार भारतीय संघाचा पुढील कर्णधार?जाणुन घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयानंतर कर्णधारपदाची खुर्ची रिकामी झाली. नुकतेच भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा पार पडला. या दौऱ्यावर युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. दरम्यान संघाची जबाबदारी शुभमन गिलच्या हाती सोपवण्यात आली होती. या मालिकेत भारतीय संघाने ४-१ ने बाजी मारली.

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं. दरम्यान फलंदाजीत फ्लॉप ठरत असलेल्या गिलकडे स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती. या संधीचा त्याने दोन्ही हातांनी स्वीकार केला. फलंदाजीसह नेतृत्वातही त्याची कमाल कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्याच सामन्यात पराभव झाल्यानंतर, भारतीय संघाने पुढील चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि मालिका ४-१ ने आपल्या नावावर केली.

भारतीय संघाचा ४-१ ने विजय

भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात ४-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेतील पाचही सामन्यांमध्ये गिल सलामीला फलंदाजी करण्यासाठी आला. यादरम्यान त्याने १७० धावा केल्या. यासह त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या खास रेकॉर्डच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

हार्दिक पंड्याचं टेन्शन वाढलं?

शुभमन गिल हा टी -२० मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली २३१ धावांसह या यादीत अव्वल स्थानी आहे. यापूर्वी कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्याला प्रबळ दावेदार मानलं जात होतं. रोहित कर्णधार असताना हार्दिक पंड्या उपकर्णधार होता. मात्र आता गिल देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. यासह रिषभ पंतला देखील कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. यापूर्वी सूर्यकुमार यादवला देखील भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे रोहितनंतर टी-२० संघाचा पूर्णवेळ कर्णधार कोण होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT