Mahieka Sharma Hardik Pandya x
Sports

Hardik Pandya Rumoured Girlfriend : हार्दिकच्या आयुष्यात स्टायलिश अभिनेत्रीची एन्ट्री? कोण आहे पंड्याची नवी गर्लफ्रेंड?

Mahieka Sharma Hardik Pandya : हार्दिक पंड्या पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री, मॉडेल महिका शर्माशी हार्दिक पंड्याचे नाव जोडले जात आहे.

Yash Shirke

  • हार्दिक पंड्याचे नाव अभिनेत्री-मॉडेल महिका शर्माशी जोडले जात आहे.

  • नताशा आणि जास्मिननंतर आता महिका शर्मा पंड्याच्या आयुष्यात आल्याची चर्चा आहे.

  • महिका शर्मा ही पुरस्कारविजेती मॉडेल असून तिने मोठ्या डिझायनर्ससोबत काम केले आहे.

Asia Cup 2025 मध्ये शानदार कामगिरी करणारा हार्दिक पंड्या पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पंड्याच्या आयुष्यामध्ये नव्या मुलीची एन्ट्री झाल्याचे म्हटले जात आहे. नताशा स्टँकोव्हिचसोबत घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिकचे नाव जास्मिन वालियाशी जोडण्यात आले. त्यांचे नाते संपुष्टात आल्यानंतर आता पंड्या अभिनेत्री, मॉडेल महिका शर्माच्या प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे.

कोण आहे महिका शर्मा?

महिका शर्मा ही एक मॉडेल आहे, ती भारतीय फॅशन क्षेत्रामध्ये तिची ओळख निर्माण करत आहे. मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी तिने इकोनॉमिक्स अँड फायनान्स या विषयात पदवी प्राप्त केली. अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये महिका शर्मा झळकली आहे. तिने मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे, तरुण ताहिलियानी यांसारख्या प्रख्यात फॅशन डिझायनर्ससोबत काम केले आहे. २०२४ मध्ये इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये तिला ‘मॉडेल ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला होता.

गुजरात, दिल्ली अशा ठिकाणी स्थानिक स्पर्धांमधून महिका शर्माने तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली. तिला फिटनेसचीदेखील आवड आहेत. तिने योगा टीचर ट्रेनिंग देखील पूर्ण केले आहे. मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असताना तिने जाहिरात क्षेत्रामध्येही पदार्पण केले आहे. अनेक जाहिरातींमध्ये महिका शर्मा झळकली आहे.

जानेवारी २०२० मध्ये हार्दिक पंड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांनी लग्न केले होते. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये दोघांचा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हार्दिक ब्रिटीश गायिका जास्मिन वालियासोबत दिसला होता. ते दोघे डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. आता जास्मिननंतर महिका शर्माशी हार्दिक पंड्याचे नाव जोडले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Cement : निकृष्ट दर्जाचे सिमेंट नामांकित कंपनीच्या बॅगमध्ये भरून विक्री; कल्याण पूर्वमध्ये बनावट सिमेंट फॅक्टरीचा पर्दाफाश

Box Office Collection : 'कांतारा' गाजवतोय अख्खं मार्केट; तर 'सनी संस्कारी'च्या कमाईत घट, कलेक्शनचा आकडा किती?

Maharashtra Live News Update : बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गातून आरक्षण मागणीसाठी भव्य महामोर्चा

Singer Passes Away: आधी बाईकवरुन अपघात, नंतर हार्ट अटॅक; प्रसिद्ध गायकाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

चंद्रकांत पाटलांचा निकटवर्तीय समीर पाटीलचा निलेश घायवळसोबत फोटो; रवींद्र धंगेकरांनी थेट पुरावाच दाखवला|VIDEO

SCROLL FOR NEXT