Hardik Pandya X
Sports

Hardik Pandya : माझ्यासाठी काळाचं चक्र ३६० डीग्री फिरलं... IPL सुरू होण्याआधी हार्दिक पंड्या भावुक

Hardik Pandya Emotional Before IPL 2025: २२ मार्च रोजी आयपीएलच्या नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने केलेल्या एका विधानाची चर्चा होत आहे.

Yash Shirke

Hardik Pandya Statement : भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या मागील काही महिन्यांपासून चर्चेत आहे. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देण्यात त्याने अमूल्य योगदान दिले होते. लवकरच सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये हार्दिककडे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी हार्दिक पंड्याने केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

२०२४ च्या आयपीएल हंगामामध्ये रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्याआधी हार्दिक गुजरातचे नेतृत्त्व करत होता. स्वार्थासाठी तो गुजरात सोडून मुंबईत आला असे काहीजण म्हणू लागले. रोहितच्या ऐवजी त्याच्याकडे कर्णधारपद दिल्याने चाहते नाराज झाले. यावरुन हार्दिकला त्रास देण्यात आला.

आयपीएल २०२४ दरम्यान लोक हार्दिकला ट्रोल करु लागले. स्टेडियममध्ये त्याला काहीजण चिडवू लागले. याचा परिणाम त्याच्या खेळावरही झाला. पण होणारा त्रास हार्दिकने सहन केला. त्यानंतर टी-२० विश्वचषकामध्ये हार्दिकने स्वत:ला सिद्ध केले. ट्रोल करणाऱ्यांची त्याने चांगल्या खेळाने बोलती बंद केली. या एकूण प्रकरणावर हार्दिकने भाष्य केले.

आयपीएल सुरु होण्यापूर्वी जिओ हॉटस्टारद्वारे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हार्दिकने हजेरी लावली होती. कार्यक्रमात बोलताना हार्दिक पंड्या भावुक झाला. 'मी कधीही हार मानत नाही. माझ्या कारकिर्दीत असा काळ आला होता, ज्यावेळेस जिंकण्यापेक्षा खेळात टिकून राहण्यावर जास्त भर देत होतो' असे हार्दिक म्हणाला.

'या सहा महिन्यात आम्ही वर्ल्डकप जिंकला. मायदेशी परतल्यावर मिळणारे प्रेम पाहून मी भारावून गेलो. माझ्यासाठी काळाचे चक्र ३६० डीग्री फिरले होते. मी जर स्वत:वर काम करत राहिलो, मेहनत करत राहिलो, तर पुन्हा एकदा कमबॅक करेन असा मला आत्मविश्वास होता. असे कधी होईल ते मला माहीत नव्हते' असे वक्तव्य हार्दिक पंड्याने केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकार कर्ज मुक्ती कधी करणार? उद्धव ठाकरेंचा शासनाला रोखठोक सवाल

Kidney Health: किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT