Yash Shirke
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी राज्यभरातून होत आहे.
क्रूर शासक औरंगजेब याची कबर महाराष्ट्रातील खुलताबाद येथे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाल्यानंतर दख्खन काबीज करण्यासाठी औरंगजेबाने दिल्ली सोडली होती.
मराठ्यांमुळे तब्बल २७ वर्ष प्रयत्न करुनही औरंगजेबाला यश मिळाले नाही. ३ मार्च १७०७ रोजी त्याचा मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी औरंगजेबाने त्याच्या अंत्यविधीबद्दल इच्छापत्र लिहून ठेवले होते.
औरंगजेब टोप्या शिवायचा, कुराणही लिहित असे, त्यातून झालेल्या कमाईतून माझी कबर बांधवी असे त्याने इच्छापत्रात म्हटले होते.
मृत्यू झाल्यास खुलताबाद येथे दफन करण्यात यावे अशी इच्छा औरंगजेबाने इच्छापत्रात लिहिली होती.
त्यानुसार औरंगजेबाचा मुलगा आजमशाहने औरंगजेबाची कबर खुलताबाद येथे बांधली, अशी माहिती इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी दिली आहे.
दगाफटका करुन जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?