Harbhajan Singh On Hardik Pandya  Saam Tv
Sports

Hardik Pandya: हे वागणं बरं नव्हं; हार्दिकला कर्णधार न मानणाऱ्या MIच्या सिनिअर खेळाडूंना हरभजनने सुनावलं

Mumbai Indians Captian Pandya: सलग तीन पराभव मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या चिंतेत पडलाय. त्याला संघाकडून पाठिंबा मिळत नसल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिक पांड्याला कर्णधार न समजणाऱ्या मुंबईच्या खेळाडूंना हरभज सिंगने चांगलेच सुनावले आहे.

Bharat Jadhav

Harbhajan Singh Navjot Singh Sidhu Ambati Rayudu slams MI Players:

हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून न स्वीकारणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघातील सिनिअर खेळाडू्ंना हरभजन सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धूने फटकारलं. राजस्थान रॉयल्सकडून दारुण पराभव झाल्यानंतर डगऑउटमध्ये हार्दिक पांड्या एकटाच बसलेला दिसला होता, त्याच्या बाजुला कोणताच खेळाडू नसल्याच दिसल्याने हरभजन सिंगने संघातील खेळाडूंची क्लास घेतल्याच वृत्त क्रिक टूडे कॉम या वेबासाईटने दिले आहे. (Latest News)

यंदाच्या आयपीएल सत्रातील मुंबई इंडियन्सचा प्रवास आतापर्यंत वाईट राहिलाय. घरच्या मैदानासह इतर दोन ठिकाणी खेळलेल्या सामन्यात मुंबईचा दारुण पराभव झालाय. पराभव दुसऱ्या कारणाने जीर झाला असेल तरी नेटकरी आणि एमआयचे चाहते हार्दिक पांड्यालाच जबाबदार धरत त्याला ट्रोल करत आहेत. दरम्यान यदाच्या आयपीएल सत्रासाठी मुंबई फ्रँचायझीने कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे दिले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोहितला बाजूला सारत हार्दिकला संघाचं नेतृत्त्व दिल्याने एमआयच्या चाहत्यासह संघातील सिनिअर खेळाडूदेखील नाराज असल्याचं दिसत आहे. हार्दिककडे संघाच नेतृत्व देणं संघातील अनेक खेळाडूंना रुचलं नसल्याची प्रचिती राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर झाली. तिसरा पराभव मिळाल्यानंतर हताश झालेला पांड्या एकटाच डगऑउटमध्ये बसला होता. त्याच्यासोबत कोणताच खेळाडू दिसला नाही.

याच गोष्टीवरून भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने प्रश्न केलाय.हरभजन सिंगसुद्धा मुंबई इंडियन्सचा माजी सदस्य होता. राजस्थान रॉयल्ससोबत झालेल्या सामन्यानंतर हरभजन सिंगने मुंबईच्या वरिष्ठ खेळाडूंच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तसेच त्याने हार्दिकला कर्णधार म्हणून स्वीकारावं अशीही विनंती केली. “हे दृश्य चांगले नाही. हार्दिकला एकटे सोडण्यात येत आहे.

फ्रँचायझीच्या खेळाडूंनी त्याला कर्णधार म्हणून स्वीकारले पाहिजे. हार्दिकला कर्णधार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, या फ्रँचायझीसोबत खेळताना त्यांनी घेतलेल्या निर्णयावर सर्वांनी ठाम राहिले पाहिजे. असेच चित्र नेहमी राहत राहिले तर मुंबईसाठी हे चांगले नसल्याचं हरभजन सिंग म्हणाला.

Mumbai Indians Captian Pandya

यासंदर्भात अंबाती रायडून यानेही भाष्य केलं आहे. संघातील काही सदस्यांकडून हार्दिकला गोंधळून टाकले जात आहे. ड्रेसिंग रुममध्ये सेनिअर खेळाडूंकडून त्याला त्याच्या मनाप्रमाणे आणि मोकळेपणाने काम करू दिलं जात नाहीये. कर्णधार असताना अशी परिस्थिती येणं हे चागलं नसल्याचं अंबाती रायडू म्हणालाय.

भारतीय संघाचा माजी खेळाडू नवज्योत सिंग सिद्धू यांनीही या प्रकरणावरून एमआयच्या खेळाडूंना खडसावलं आहे. हार्दिक निराश आणि दु:खी आहे कारण त्याच्याशी बोलू शकणारे कोणीही नाही. इतर खेळाडूंनी हे समजून घेतले पाहिजे. संघ तेव्हाच जिंकू शकतो जेव्हा प्रत्येकजण एक संघ म्हणून एकत्र खेळतो. त्यांनी तसे केले नाही तर मुंबई जिंकणार नाही. हार्दिकचे दृश्य दुःखद असल्याचं सिद्ध म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

America : हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस, मुलाने केली वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण | VIDEO

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

Footballer Death : कार अपघातात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

SCROLL FOR NEXT